Students wash the feet of BJP corporator Varsha B. Sathe during a Guru Purnima programme at a Pune Municipal Corporation school, triggering widespread criticism and demands for an inquiry. Sarkarnama
पुणे

PMC School: पुण्यात भाजप नगरसेविकेने विद्यार्थ्यांकडून पाय धुवून घेतले : शाही पाद्यपुजनाचे फोटो व्हायरल होताच राष्ट्रवादी आक्रमक

Pune Municipal School, Guru Purnima, Varsha Sathe: पुण्यातील सुखसागर नगर महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविका वर्षा साठे यांचे पाय धुतल्याने वाद निर्माण झाला असून चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal School: पुणे शहरातील सुखसागर नगर भागातील एका महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजपच्या महिला नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांचे पाय धुण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता यावर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

या प्रकाराचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शाळा ही शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची ठिकाणे असून ती व्यक्तिपूजेचे केंद्र बनू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, याची आठवण करून देत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि संविधान असावे, कोणत्याही व्यक्तीची पूजा नव्हे, असे परदेशी यांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधीचे पाय धुण्याचा हा प्रकार संविधानिक मूल्यांच्या विरोधात असून शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा असल्याची टीका त्यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी अमोल परदेशी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT