SIRच्या वर्कलोडमुळं आणखी एका शिक्षकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न! निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

Election Commission SIR : महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमध्ये सध्या मतदार यादी फेरपडताळणी (एसआयआर) मोहिम सुरु झाली आहे.
SIR News
SIR NewsSarkarnama
Published on
Updated on

Election Commission SIR : महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमध्ये सध्या मतदार यादी फेरपडताळणी (एसआयआर) मोहिम सुरु झाली आहे. पण हे काम करत असताना ज्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो मोठ्या प्रमाणावर तणावात असल्याचं चित्र आहे. नुकत्याच एका घटनेमध्ये एका शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळं या अतिरिक्त कामामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

SIR News
Thaimaman Scheme : CM विजय यांची मोठी घोषणा! सरकारी रुग्णालयात बाळ जन्मल्यास आईला सोन्याची अंगठी भेट; 'थाईमामम स्कीम' नेमकी काय?

दिल्लीतील सरकारी शाळेतील शिक्षकानं ८ जुलै रोजी एसआयआरच्या अतिरिक्त कामामुळं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या शिक्षकाच्या कुटुंबियांनी आरोप केला की, प्रशासनानं सातत्यानं या शिक्षकाच्या मेडिकल लिव्हच्या विनंतीकडं दुर्लक्ष केलं. तसंच कुठल्याही सुट्ट्या न घेता आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळं संबंधित शिक्षक प्रचंड तणावात होता त्यामुळं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. पण चांगली गोष्ट अशी की तो या प्रयत्नातून बचावला आहे.

SIR News
Shivsena UBT : ठाकरेंचे नगरसेवक फोडायला नेमले एजंट! दिली जातेय ५ कोटींची ऑफर; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे धक्कादायक आरोप

आनंद कुमार सरोहा (वय ४५) असं या शिक्षकाचं नाव असून तो सर्वोदय बाल विद्यालय, ललिता ब्लॉक, शास्त्री नगर या शाळेत गणित हा विषय शिकवतात. या शिक्षकानं दिल्लीतील झाशीची राणी उड्डाणपुलावरुन खाली उडी घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो गंभीररित्या जखमी झाला असून यानंतर या शिक्षकाला पहिल्यांदा हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला सेंट स्टिफन रुग्णालयात शिफ्ट करण्यास सांगण्यात आलं. या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर आनंद कुमार या शिक्षकाची प्रकृती स्थिर असून तो आता धोक्याच्या बाहेर आहे.

आनंद कुमार सरोहा यांच्यावर एसआयआर प्रक्रियेत बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून सुपरव्हाजरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडं सदर बझार या भागातील १४१-१५० मतदान केंद्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एसआयआर प्रक्रियेत मतदार याद्या अपडेट करण्याचं काम असतं, यासाठी यादीतील मतदारांची पडताळणी करण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करावी लागते. तर सुपरव्हायझरला या सर्व बीएलओमध्ये समन्वय साधणं आणि त्यांनी केलेल्या कामाचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम सोपवलेलं असतं. या कामासाठी त्यांना अधिक वेळ द्यावा लागतो.

SIR News
Nashik Politics: नाशिक महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’ ऑन? ठाकरेंचे १२ नगरसेवक शिवसेनेत जाण्याची चर्चा: प्रत्येकी २ कोटी विकासनिधीचे आमिष

या शिक्षकानं लिहिलेली सुसाईड नोट देखील समोर आली आहे. यामध्ये शिक्षकानं म्हटलंय की, आपल्याला गेल्या तीन-चार दिवसांपासून अत्यंत तणावात काम करावं लागत आहे. याचा माझ्या आरोग्यावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. त्यांच्या या सुसाईड नोटवरुन पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. या एफआयआरच्या कॉपीमध्ये देखील या शिक्षकाच्या तणावपूर्ण स्थितीचा उल्लेख केला आहे. तसंच शारिरिक तणाव असल्याचं म्हटलं आहे. प्रकृतीवर विपरीत परिणाम झालेला असतानाही निवडणूक आयोगाकडून या शिक्षकाच्या विनंतीकडं दुर्लक्ष करुन त्यांना वैदकीय रजाही घेऊ दिली नाही. उलट दिलेल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला. यावरुन अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या अमानुष पद्धतीच्या वागणुकीविरोधात आता लोक प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com