Pune Municipality employee arrested for taking bribe :  Sarkarnama
पुणे

PMC Bribe News : पुणे पालिकेतील कर्मचाऱ्यास तब्बल एक लाखाची लाच घेताना अटक; ACB ची धडक कारवाई !

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे महानगरपालिकेतील कर्मचाराऱ्याला तब्बल एक लाख रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. आपल्या अर्जित रजेच्या बिलाचा धनादेश काढण्यात यावा, या कामासाठी एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला एक लाखेच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Sqad) शुक्रवारी (ता. ३०) ही कारवाई केली. (Latest Marathi News)

या प्रकरणी पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. प्रवीण दत्तात्रेय पासलकर (वय ५०) असे अटक केलेल्या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते महापालिकेत बिगारी (वर्ग ४) पदावर कार्यरत आहेत. गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांना अटक करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आरोग्य विभागातून मुकादम म्हणून २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शिल्लक अर्जित रजा रोखीकरणाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी प्रवीण पासलकर यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेच्या आवारात सापळा रचून प्रवीण पासलकर यांना लाच घेताना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Pune Municipality employee arrested for taking bribe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT