Pune News : डिआरडीचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकरच्या विरोधात एटीएसकडून (दहशतवादी विरोधी पथक) दोन हजार पानांचं दोषारोपपत्र तयार करण्यात आलं आहे. कुरूलकरची पॉलिग्राफ आणि सायकोलॉजी चाचणी परवानगीची मागणीही करण्यात आली आहे. ही नवीन अपडेट कुरूलकर प्रकरणी समोर येत आहे. (2000 page charge sheet by ATS against Pradip Kurulkar)
डिआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सद्या एटीएसच्या अटकेत आहेत. आज कुरूकरविरोधात दोन हजार पानांचं दोषारोपपत्र एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. यात वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आतापर्यंत कुरूलकर प्रकरणी करण्यात आलेल्या तपासणीत अनेक गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत.
याप्रकरणी ७ जुलै रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत तपास करणारे एटीएसचे प्रभारी यांनीही या चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. कारण प्रदीप कुरूलकरांकडून याबाबत काही लपवलं जातंय का? खोटं बोललं जातंय का? याबाबत एटीएसकीडून संशय व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.