Murlidhar Mohol greets Jain monks during his visit to resolve the 230 crore Jain Boarding dispute in Pune, signaling a possible breakthrough. Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol : जैन बोर्डिंगच्या वादातून वाचण्याचा मुरलीधर मोहोळांपुढे 'हाच' एकमेव पर्याय...

Murlidhar Mohol Jain Boarding Controversy : जैन बोर्डिंगची 230 कोटीची डील रद्द करणे हाच या प्रकरणावरचा तोडगा असू शकतो, अशी एक पोस्ट सकाळी लिहिली होती. दुपारनंतर पुण्यात तशी दृश्य स्वरुपात घडामोडी घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या दुसर्‍याच दिवशी मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली.

ब्रिजमोहन पाटील

Pune Jain Boarding controversy : जैन बोर्डिंगची 230 कोटीची डील रद्द करणे हाच या प्रकरणावरचा तोडगा असू शकतो, अशी एक पोस्ट सकाळी लिहिली होती. दुपारनंतर पुण्यात तशी दृश्य स्वरुपात घडामोडी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसर्‍याच दिवशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. तिथे पोहोचताच मोहोळ यांनी जैन मुनींना नमस्कार केला.

"तुमच्या मनासारखा निर्णय 1 नोव्हेंबर पर्यंत होईल, मी यात महत्वाची भूमिका बजावणार असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात 'बिना मांगा ग्यान' ची पोस्ट लिहिताना जैन बोर्डिंगचा वाद संपवायचा असेल तर 230 कोटींची डील रद्द करायची, ट्रस्टने गोखले बिल्डरला पैसे परत करायचे आणि गोखलेंनी जमीन परत देऊन टाकायची, हाच तोडगा असू शकतो, असं म्हंटलं होतं.

प्रक्रिया किचकट असली तरी यासाठी पाठपुरावा करावा लागेल आणि हे होऊ शकत असं काही तासापूर्वी लिहिलं गेलं आणि नेमकं याच दिशेने पुढील वाटचाल होणार असल्याचेही मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर स्पष्ट झाले आहे. आता 1 नोव्हेंबरपर्यंत काय काय होणार हे बघावे लागेल.

28 ऑक्टोबरपर्यंत हा व्यवहार 'जैसे थे' ठेवा असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. तो पर्यंत तर ऑन पेपर काही करता येणार नाही. पण पडद्या मागे घडामोडी घडतील. नोव्हेंबरच्या सुरूवातीला म्हणजे 2 नोव्हेंबरपासून खासदार क्रीडा महोत्सव सुरू होत आहे. पण त्यापूर्वी जैन मुनी जैन बोर्डिंगची डील रद्द करावी यासाठी अन्नपाणी त्याग करून आंदोलन सुरू करणार आहेत.

त्याचे पडसाद फक्त पुण्यापुरते मर्यादित नसतील. त्यामुळे हे आंदोलन भाजपला परवडणारे नाही. त्यापूर्वी या प्रकरणात महत्वाची घडामोड होणे मोहोळ यांच्यासाठी महत्वाचे आहे. अन्यथा धंगेकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे (महाविकास आघाडी उद्यापासून या विषयात आंदोलन करत आहे.) आरोप आणखी तीव्र होऊ शकतात, भाजप बँकफुटवर जाईल.

मोहोळ यांच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी 27 ऑक्टोबरपासून डील रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. याच बरोबर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी ही केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे होत असताना पुढची राजकीय किंमत चुकवावी लागू नये यासाठी घडामोडी घडत आहेत.

पुढे गोखले बिल्डरने जमीन ट्रस्टला देऊन त्यांचे 230 कोटी पैसे परत करायला लावणे हा निर्णय मुरलीधर मोहोळ घ्यायला लावतील. याच संदर्भात शुक्रवारी महत्वाची घडामोड मुंबईत घडली. मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, खासदार चषक स्पर्धेचे निमंत्रण द्यायला गेले होते असे सांगितले जात असले तरी ही भेट त्यापुरती मर्यादीत नव्हती. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला जाऊन धर्मगुरूंची भेट घ्यायची हे ठरले आणि तसे झाले. तूर्त इतकेच...!!!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT