Maharashtra Politics : 'महापालिका निवडणुकीनंतर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, मोदी-शहांचा शिंदेंना आदेश...'

Sanjay Raut on Eknath Shinde's Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच भेटीवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Eknath Shinde, Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 26 Oct : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच भेटीवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

शिवाय यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबात मोठा दावा देखील केला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी शिंदेंना, महापालिका निवडणुकीनंतर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, असं सांगितलं आहे, असा दावा राऊतांनी केला.

शिवाय जेव्हा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा शिदेंचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीला जातात. रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात, अशी टीकाही राऊतांनी केली.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Solapur Politics : कमरेतून मोडेन म्हणणाऱ्या उत्तम जानकारांवर मंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, तर...'

तर एकनाथ शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते, असा टोला लगावत याआधी ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर दिल्लीतील नेत्यांना यावं लागायचं. पण त्यांनी चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेना कळत नाही, इतिहास माहीत नाही, असंही राऊत म्हणाले.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Uttar Bharatiya Ekta Manch : ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक झटका; 25 वर्षांपासून बरोबर असलेल्या उत्तर भारतीय एकता मंचने साथ सोडली

प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असतं

तर शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष असून प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असते. त्यांची मुख्य कार्यालये राज्यात असतात. ती दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू त्यांच्या पक्षाचा काम घेऊन दिल्लीत जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतं, असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com