Ganesh Festival and pune muslim .jpg Sarkarnama
पुणे

Pune Muslim News: पुण्यातील मुस्लिम समाजाचं ऐतिहासिक पाऊल; गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद आल्यानं घेतला 'हा' मोठा निर्णय

Pune Ganesh Festival 2025 : पुणे शहरात गणेश विसर्जनादरम्यान लाखो भाविक एकत्र येतात, त्यामुळे वाहतूक आणि सुरक्षेचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे शहरातील मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा आणि आंतरधर्मीय सौहार्द जपण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदा 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यानं, मुस्लिम (Muslim) समाजानं आपला पारंपरिक जुलूस 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर 2025 रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

सामाजिक सलोख्याचा संदेश

पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका 6 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडतात. याचवेळी ईद-ए-मिलादचा जुलूसही निघाला, तर वाहतूक कोंडी, गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवर प्रचंड ताण येऊ शकतो. या परिस्थितीत कोणत्याही सणाला गालबोट लागू नये आणि दोन्ही समुदायांचे उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी मुस्लिम समाजाने हा संवेदनशील निर्णय घेतला आहे.

मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी अन्वर शेख यांनी सांगितले, "गणेश भक्त आणि जुलूसातील मुस्लिम बांधवांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पडल्यानंतरच आम्ही आमचा जुलूस काढू." अन्वर शेख म्हणाले.

मुस्लिम समाजाकडून आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम समाजाने केवळ जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णयच घेतला नाही, तर ईद-ए-मिलादच्या जुलूसात डीजे आणि प्रचंड आवाजाच्या साऊंड सिस्टीमच्या वापराला ठाम विरोध दर्शविला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, धार्मिक मिरवणुकीत डीजे किंवा जास्त आवाजाच्या सिस्टीमला परवानगी नाही. याचा अवमान टाळण्यासाठी पुणे (Pune) पोलिसांना विनंती करण्यात आली आहे की, जुलूसात केवळ पारंपरिक पठणासहच मिरवणूक निघावी आणि डीजे वापराला परवानगी देऊ नये. यामुळे जुलूस धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपातच राहील, असा समाजाचा विश्वास आहे.

पुणे शहरात गणेश विसर्जनादरम्यान लाखो भाविक एकत्र येतात, त्यामुळे वाहतूक आणि सुरक्षेचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुस्लिम समाजाने पोलिसांशी चर्चा करून आणि परस्परांचा आदर राखून हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही, गेल्या वर्षी अशीच परिस्थिती उद्भवली, तेव्हा मुस्लिम समाजाने जुलूस पुढे ढकलून सामाजिक सौहार्दाचा आदर्श ठेवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT