
थोडक्यात बातमी
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे, मात्र हायकोर्टाने पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई केली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केला की जरांगेंच्या मागे शरद पवार व उद्धव ठाकरे आहेत, तसेच त्यांची भाषा मग्रुरीची असून त्यांना अटक व्हायला हवी.
न्यायालयानं स्पष्ट केलं की गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलनास परवानगी नाही, सरकारने खारघर किंवा इतर ठिकाणी परवानगी विचारात घ्यावी.
Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत राज्यभरातील मराठा बांधव दाखल होणार असून मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलनही जरांगेंनी छेडण्याचा इशाराही दिला आहे. कोर्टानं या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनावर ठाम आहेत. पण आता याचदरम्यान, जरांगे यांच्याबाबत खळबळ उडवून देणारा दावा करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, जरांगेंना आंदोलनासाठी न्यायालयानं परवानगी नाकारली आहे. त्यांच्या मुंबईतील आंदोलनावरुन आम्ही पोलिसांकडे रितसर तक्रारही दिली होती. न्यायालयातही अर्ज केला होता. पण मनोज जरांगे हे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. जरांगेंच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे.
सदावर्ते म्हणाले, मुंबईला जो कुणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्याला कायदा त्याची जागा दाखवेल. जरांगे माजला असून त्याची भाषा मग्रुरीची आहे. त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल. पण मनोज जरांगे, तू आता आंदोलन करु शकत नाहीस असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.
जरांगेंचे आंदोलन दिसत असलं तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले आहे. यापुढे त्याचे कोणतेहा बेकायदा कृत्य चालणार नाही असा इशारा सदावर्तेंनी दिला. किती माजलाय तो जरांग्या, त्याची भाषा मग्रुरीची आहे. जरांगेला अटक होणे आणि त्याला कायदा कळणे यानंतरच त्याला समजेल असंही सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली होती. या ठिकाणी ते आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी राज्यभरातील सर्व आंदोलकांना आझाद मैदानात येण्याचं आवाहन केलं होतं. पण आता जरांगेंना मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे.
पोलिस प्रशासनानं परवानगी दिली नसल्यानं आझाद मैदानात आंदोलनासाठी कोर्टानं जरांगेंना मनाई केली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्ते अॅमी फाऊंडेशनला देखील हायकोर्टानं फटकारलं आहे. जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचे आदेश दिले आहेत. जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
प्रश्न 1: मनोज जरांगे यांनी कोणत्या दिवशी आंदोलन जाहीर केलं आहे?
उत्तर: 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात.
प्रश्न 2: उच्च न्यायालयाने आंदोलनाबाबत काय निर्णय दिला?
उत्तर: पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली.
प्रश्न 3: गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंबाबत कोणता आरोप केला?
उत्तर: जरांगे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर आंदोलन करत आहेत असा दावा.
प्रश्न 4: आंदोलनासाठी अन्य पर्यायी ठिकाणांचा विचार होऊ शकतो का?
उत्तर: होय, सरकार नवी मुंबई किंवा खारघर येथे परवानगीचा विचार करू शकतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.