Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Pune News: आम्ही शेतकऱ्यांवर तर गोळीबार केला नाही; मोहोळांच्या वक्तव्यावर धंगेकरांचा टोला; म्हणाले, "अजित पवारांना..."

सागर आव्हाड

Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'अब की बार गोळीबार सरकार' असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवाय सुळे यांनी पुण्यातील गुंडगिरीवरुनही सरकारला सुनावलं आहे. सुळेंच्या या वक्तव्यावर महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, "सुप्रियाताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण मी ताईंना आठवण करून देतो, जेव्हा त्यांची राज्यात आणि देशात सत्ता होती तेव्हा त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला. तसं तरी आम्ही काही केलेलं नाही. बोलायला गेलो तर खूप काही निघेल. परंतु, आम्ही वैयक्तिक बोलत नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर मोहोळांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीचे पुण्यातील (Pune) उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शेतकऱ्यांव गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री हे अजित पवार (Ajit Pawar) होते त्यामुळे मोहोळ यांनी अजितदादांना प्रश्न विचारावा असं धंगेकर म्हणाले. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पुण्यातील दोन्ही उमेदवार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकशाही धोक्यात आली आहे

भाजपकडून संविधान बदलण्याचं काम केलं जातं आहे. अशी टीका विरोधक करत आहेत यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, हे शंभर टक्के खोटं आहे असं होणं कदापि हे शक्य नाही. विरोधक हे खोटं बोलण्याच काम करत आहेत. उलट मोदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी खूप मोठं काम केलं असल्याचं मोहोळ म्हणाले.

आज देशाचं संविधान (Constitution) बदलण्याची चर्चा सुरू आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेवटचा आधार म्हणून बाबासाहेबांचा हा ग्रंथच देशाला वाचवू शकतो. भाजपचे खासदारांनीच संविधान बदलण्याची भाषा केली होती. त्यांचा संविधान बदलण्याचा डाव जनता हाणून पाडेल असं धंगेकर म्हणाले.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

मुंबईत भर रस्त्यावर गोळीबार होत असेल तर ही बाब गंभीर आहे. 'अब की बार गोळीबार सरकार' असं मी नेहमी म्हणते त्यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यात गोळीबार झाला. सत्तेत असलेल्या आमदाराने गोळीबार केला होता. पोलिस ठाण्यात गोळीबार करण्याची हे लोक हिम्मत करत असतील, तर रस्त्यावर गोळीबार करणे हे सत्तेतील लोकांना फार काही वाटणार नाही.

सुसंस्कृत पुण्यात कोणाला कोयता गँग माहीती नव्हती. ती अधून-मधून डोकं वर काढते. यावर कायस्वरूपी निर्णय का होत नाही?. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली असून हे गृहमंत्र्याच अपयश आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT