Eknath Shinde: महायुतीत एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, मुख्यमंत्र्यांचा दावा

Eknath Shinde: "ही केवळ लोकसभा निवडणूक नसून ती विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. गेल्या 50 वर्षात जे देशाच्या विकासाला बाधक ठरले, त्यांना चारीमुंड्या चित करण्याची ही निवडणूक आहे."
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Kolhapur Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे काम घरोघरी पोहोचवा, त्यांची विकासाची दृष्टी अमाप आहे. महायुतीमध्ये एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केला.

कोल्हापूरमधील महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, "ही निवडणूक लोकसभेसाठीची नाही, तर देशाच्या विकासाची आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा."

लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील (Kolhapur and Hatkanangle constituencies) महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर दौऱ्यांवर आले होते. यावेळी त्यांनी हॉटेल पॅव्हेलियनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मधुसूदन हॉलमध्ये पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी खासदार निवेदिता माने, खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik), आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर आदी नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) ही केवळ लोकसभा निवडणूक नसून ती विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. गेल्या 50 वर्षात जे देशाच्या विकासाला बाधक ठरले, ज्यांनी देशाला आणि राज्याला मागे ठेवले, त्यांना चारीमुंड्या चित करण्याची ही निवडणूक आहे.

Eknath Shinde
Narendra Modi: 70 वर्षांवरील व्यक्तींसाठी मोदींची मोठी घोषणा; 5 लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार

जी कामं पन्नास वर्षात झाली नाहीत, ती मागील दहा वर्षात झाली आहेत. अयोध्येच राम मंदिर बांधणार, पण तारीख नाही सांगणार, अशी टीका करणाऱ्यांना मंदिर उभं करून दाखवलं. आर्थिक विकासात देश जगात अकराव्या स्थानी होता. तो आता पाचव्या स्थानी आला आहे. भविष्यात तो तिसऱ्यांस्थानी आणण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत. याच विकासाला साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे असं शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Lok Sabha Election: कोल्हेंच्या जाहीरनाम्यात माझ्या कामांचा उल्लेख, आढळराव पाटलांचा मोठा दावा

2047 साली देशाला आर्थिक महासत्ता बनवायचा अजेंडा आहे. आपल्याकडे नेतृत्व आहे. नियोजन आहे. सरकार तुमचं, आमचं, सर्वसामान्यांचं आहे. हे सर्व जनतेसमोर घेऊन जा, महायुतीतील सर्व पक्षांनी एकजूट ठेवली तर विरोधकांची डिपॉझिट जप्त होईल, असा दावा शिंदे यांनी केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com