Vishwas Gangurde Sarkarnama
पुणे

Pune News: भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो

Former Parvati BJP MLA Vishwas Gangurde : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे (वय ७८) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर सात दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले होते. रुपी बॅकेचे ते संचालक होते. पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 1999 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT