Akola News: 'आंबेडकरांना मते देऊ नका,' असे मौलवींना सांगणारा काँग्रेस नेता अडचणीत

Congress Leader Sajid Khan Pathan: मौलवींना साजिद खान पठाण यांनी फोनवरून आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले, असे विचारत शिवीगाळ केली होती. आंबेडकरांबाबत अपशब्द वापरले होते.
Congress Leader Sajid Khan Pathan
Congress Leader Sajid Khan PathanSarkarnama

Akola Political News : काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan) कार्यक्रते आक्रमक झाले आहेत. 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी साजिद खान पठाण यांच्याविरोधात अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (बुधवारी) उशीरा त्यांच्याविरोधात अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा झाला. साजिद खान पठाण यांच्याविरोधात जिल्ह्यात वंचितकडून तीव्र संताप लाट पाहायला मिळत आहे.

Congress Leader Sajid Khan Pathan
Ajit Pawar News : अजित पवार आहेत तरी कुठे? बारामती-शिरुरच्या निवडणुकीनंतर कार्यक्रमांना दांडी!

वंचितचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महानगरध्यक्ष गजानन गवई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधिक्षकाकडे केली होता.

बुधवारी दिवसभरात विविध पोलिस ठाण्यात वंचितनं साजिद खान पठाण विरोधात तक्रारी दिल्या. अखेर रात्री उशिरापर्यंत पोलिसांत साजिद खान पठाण यांच्यावर विविध कलमान्वयेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असलेल्या प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) मतदान करा, असे आवाहन एका मौलवींनी केले होते. या मौलवींना साजिद खान पठाण यांनी फोनवरून आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले, असे विचारत शिवीगाळ केली होती. आंबेडकरांबाबत अपशब्द वापरले होते. मौलवी यांनी त्यांनी फोनवरून धमक्या दिल्या होत्या. त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ती कथित ऑडिओ माझी नाही, मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याची साजिद खान पठाण यांनी सांगितले. संबधीत मौलवी यांनीही सुध्दा साजिद खान पठाण यांच्याकडून धमक्या आणि शिवीगाळ झाली नसल्याचे म्हटले आहे.

कोण साजिद खान पठाण?

काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक, अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता राहिले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी झाली होती. अवघ्या 2 हजार 662 मतांनी साजीद खान पराभूत झाले. दुसऱ्यांदाही त्यांना काँग्रेसनं अकोला पश्चिम मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com