CP Ritesh Kumar
CP Ritesh Kumar Sarkarnama
पुणे

Pune News : पोलीस आयुक्त रितेश कुमार 'अॅक्शन मोड'मध्ये; 'या'दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिला दणका

सरकारनामा ब्यूरो

Pune Police News : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मागील महिन्यात पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत देखील दिले होते. आता रितेशकुमार हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी पुण्यातील दोन पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचं आव्हान पोलीस आयुक्त रितेश कुमार ( Cp Ritesh Kumar) यांच्यासमोर आहे. याच पार्श्वभूमीवर येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सिताराम कदम आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सुनिल संखे यांच्याबाबत रितेशकुमार यांनी मोठा आदेश दिला आहे. या दोन्ही पोलीस अधिकार्यांना 10 दिवसांसाठी कंट्रोल रूमसोबत बांधील ठेवलं आहे. या निर्णयामुळे पोलीस (Police) आयुक्तांचा रुद्रावतार धारण केल्याची चर्चा आहे.

पुण्यात काही दिवसांमध्ये पाच दिवसांत हत्या, गोळीबार,चोरी, अत्याचार, दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात येरवडा आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळेच पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांबाबत नियंत्रण कक्षाशी बांधील ठेवण्याचा आदेश देत यापुढे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आय़ुक्तांनी कठोर पावले उचलणार असल्याचे संकेत पोलीस दलाला दिलेला आहे.

रितेश कुमार यांनी डिसेंबर महिन्यात अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. गृहविभागाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावरुन रितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपासाबाबतची माहिती घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT