Pune News : RTO
Pune News : RTO Sarkarnama
पुणे

Pune Auto Strike: RTO कार्यालयावरील आंदोलन रिक्षाचालकांना भोवलं : 37 जणांना अटक!

सरकारनामा ब्यूरो

Pune News RTO : ओला व उबेरसारख्या ऑनलाईन बेकायदा बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षाचालकांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. या बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात यावे, ही प्रमुख मागणी घेऊन रिक्षाचालकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातील सक्रीय सहभागामुळे आता पुण्यातील रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षाचालंकांनी चक्का जाम आंदोलन केल्याने, हे आंदोलन करणे रिक्षाचालकांना चांगलेच भोवले आहे. पुण्यातील तब्बल ३७ रिक्षाचालकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलन केल्यामुळे रिक्षाचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरले, असा ठपका रिक्षाचालकांवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात काल आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात चक्का जाम आंदोलन केले होते. संध्याकाळी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.

पोलिसांनी आंदोलन करू नका, यासाठी कलम १४९ प्रमाणे नोटीस देखील जाहीर केली होती.भारतीय दंडात्मक कलम १४३, १४५, १४७, १४९, १८८, ३३६, ३५३, ३४२ यासह क्रिमिनल कायदा कलम ३ व ७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT