Pune News  Sarkarnama
पुणे

Pune News : 'एसीबी'च्या कारवाईचा धडाका, एका दिवसात रचले दोन ट्रॅप : आयुक्तच जाळ्यात!

Pune News : एसीबीची धडक कारवाई, कोणी लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

सरकारनामा ब्यूरो

Pune News : नवीन एसपी (पोलिस अधीक्षक)आणि अधिकारी मिळताच पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा(एसीबी) सुरु झालेलाल कारवाईचा धडाका कायम आहे.काल,तर त्यांनी पुण्यात एका दिवसात दोन `ट्रॅप`केले. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

लाच घेतानाच्या दोन घटनांत तिघांना पकडण्यात आले आहे. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सहाय्यक आय़ुक्त साहेब एकनाथराव देसाई या वर्ग एकच्या अधिकाऱ्याविरुद्धची कारवाई ठळक आहे.

पहिल्या घटनेत शिक्षण विभाग कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय ३८) आणि कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधऱ लोंढे (वय ५७) यांना एका शिक्षकाकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.त्याबाबत लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरलाचखोरीचा दुसरा गुन्हा कालच पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात दाखल झाला.देसाई त्यात आरोपी आहेत. दहा हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.एका कंपनीचा लॅक्टोज विक्रीचा अर्ज मंजूर करण्यासाठी त्यांनी ही लाच काल घेतली.एसीबीचे पीआयभारत साळूंके पुढील तपास करीत आहेत.

कोणी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे एसीबीचे एसपी अमोल तांबे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT