Ncp News: राष्ट्रवादीत 'भावी मुख्यमंत्री'पदाची शर्यत; जयंत पाटलांनंतर आता अजितदादांचे पोस्टर्स!

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा झाली होती.
Ajit pawar & Jayant Patil
Ajit pawar & Jayant Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar & Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला मुंबईत जागोजागी त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनरवर पाटील यांचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करण्यात आला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातून पाटील हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा संकेत देण्यात आले होते. पण आता अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेलं पोस्टर झळकल्यानं राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार शर्यत असल्याची चर्चा सुरु आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स झळकले आहेत. यावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजितदादा अशी कॅप्शनही दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला देखील झळकले होते.

जयंत पाटलांच्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा झाली होती. मुंबईत जागोजागी जयंत पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहे. या पोस्टर्सवर जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

Ajit pawar & Jayant Patil
Chinchwad By- Election : पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी पण बंडखोरीची हॅट्रिक करणाऱ्या कलाटेंवर कारवाई नाही...

निलेश लंकेंचं ते विधान अन् मुख्यमंत्रीपदाची चर्चा

आगामी काळात होणार्या निवडणुकीत आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना फक्त पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तरी आपले राज्य २५ वर्ष पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी खात्री आहे. मात्र, हे फक्त भाषणातून बोलायचे नाही. येत्या वर्षभरात अजितदादांच्या कामाची पद्धत घराघरात पोहचवून पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे आमदार निलेश लंके म्हणाले होते.

Ajit pawar & Jayant Patil
Chinchwad By-Election : 'पेड न्यूज' प्रकरणी अश्विनी जगतापांना नोटीस ; काय केला खुलासा?

रोहित पवारांची मुख्यमंत्री म्हणून अजितदादांना पसंती?

अजित पवार यांचे काम फार जवळून पाहिलेले आहे. मला त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे असे वाटते असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com