Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Maharashtra Assembly Election : नाराजी दूर सारत 'या' नेत्याने 'मविआ'कडे केली 20 ते 22 जागांची मागणी

Mahavikas Aghadi Seat Sharing for Maharashtra Assembly Election : "महाविकास आघाडीत डाव्या विचाराचे पक्ष आहेत. त्यांची काल आणि परवा बैठक पार पडली उद्या पुण्यातही बैठक होणार आहे. कालच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आमची मदत होईल का?"

Sudesh Mitkar

Pune News, 15 Oct : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. या पराभवामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात होतं.

मात्र, ही नाराजी बाजूला सारत आता विधानसभा निवडणुकीसाठी शेकाप आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची खलबत्ता सुरू झाली आहेत. यामध्ये तब्बल 20 ते 22 जागांची मागणी त्यांनी केल्याचं समोर आलं आहे.

याबाबत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) चर्चा देखील केली आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद करताना जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. जयंत पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीत डाव्या विचाराचे पक्ष आहेत. त्यांची काल आणि परवा बैठक पार पडली उद्या पुण्यातही बैठक होणार आहे.

कालच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आज महाविकास आघाडीची (Mhavikas Aghadi) जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आमची मदत होईल का? याची चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आघाडीची एकी कायम राहील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."

विधानपरिषद निवडणुकीत मी नाराज कधीच नव्हतो. चार मतं कमी पडले त्यामुळे माझा पराभव झाला. काँग्रेसची मतं फुटली हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, तो विषय आता जुना झाला आहे. महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने राज्यात येईल. महायुतीविरोधी लाट आहे ती कायम ठेवण्यामध्ये आम्हाला यश येईल.

आमचे दोन ते तीन जागांवर मतभेद आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये हे मतभेद मिटतील आणि भाजप विरोधी वातावरण असचं राहील. महाविकास आघाडीकडे आम्ही 20 ते 22 जागा मागत आहोत. त्यामध्ये काही कमी जास्त होतील. मात्र, काल शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आपण सांगोला येथून निवडणूक लढवणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT