Nitin Gadkari, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Nitin Gadkari : "काम महाराष्ट्र सरकारचं अन् शिव्या मी खातो..."; नितीन गडकरी स्पष्टचं बोलले

Jagdish Patil

Pune News, 22 Sep : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमी रोखठोक भूमिका मांडत असतात. मग ते बोलताना आपला पक्ष आणि विरोधक असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळेच विरोधक देखील गडकरी यांच्यावर पातळी सोडून टीका करत नाहीत.

अशातच आता एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी थेट महाराष्ट्र सरकारलाच इशारा दिल्याच समोर आलं आहे. राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतीत बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम महाराष्ट्र सरकारचं असतानाही मला शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत खड्डे न बुजविल्यास हे रस्ते राज्य सरकारकडून काढून घेतले जातील, असा इशारा नितीन गडकरी यांनी दिला. शिवाय याबाबत केंद्र सरकार राज्याला नोटीस पाठविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण, तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलाताना गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे आपणाला शिव्या खाव्या लागत असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे रस्ते राज्य सरकारचे आहेत. सरकारने आठ हजार कोटीला हे रस्ते विकले.

मात्र, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम केलं जात नाही. रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे मी आत्ताचं सांगितलं त्याबाबत आजच नोटीस पाठवा ती महिन्याच्या हे रस्ते दुरुस्त केले नाहीत. तर ते रस्ते राज्य सरकारकडून काढून घ्या."

दरम्यान, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. मात्र, मी कधीही जात-पात पाळत नाही, पाळणार नाही आणि जातीपातीचे राजकारणगी करणार नाही असं म्हणत, मला मत द्या किंवा देऊ नका, मी सगळ्यांची कामे करणार, असंही गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT