Police detain a youth in Pune after a viral video allegedly showing him raising “Pakistan Zindabad” slogans sparked protests by local Hindu organisations. Sarkarnama
पुणे

Pune viral video : पुण्यात इलेक्ट्रिशनची पाकिस्तान जिंदाबाद ची घोषणाबाजी... पोलिसांनी घेतलं ताब्यात.. का काय आहे प्रकार?

Pune Parvati Police Action : पुण्यात एका इलेक्ट्रिशियनचा पाकिस्तान जिंदाबाद घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले असून पर्वती पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यातून सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल येत होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण जो इलेक्ट्रिशियनच काम करत आहे. तो पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना पाहायला मिळत आहे. तसेच मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार तुम्हाला काय करायचं असेल ते करा असं देखील हा तरुण या व्हिडिओमध्ये बोलताना पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं आणि या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना पत्र देखील दिले आहे. त्यामध्ये पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणारा अमन मुल्ला या व्यक्तीकडून पाकिस्तानचे उदात्तीकरण करत "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा दिल्याची बाब समोर आली आहे.

तसेच हा प्रकार हा देशाच्या सार्वभौमत्वाचा व देशभक्त नागरिकांच्या भावनांचा अपमान करणारा असून समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. भारत देशात राहून परदेशी राष्ट्राचे समर्थन करत अशा प्रकारच्या घोषणा देणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून यामुळे सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तीवर लागू असलेल्या कायद्यानुसार योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. यानंतर या तरुणाला पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये एक तरुण इलेक्ट्रिशन च काम करत आहे. तर दुसरा व्यक्ती त्याचा व्हिडिओ काढत आहे.आणि त्याला पाकिस्तान मुर्दाबाद म्हण असं सांगत आहे. त्यावर तो तरुण पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार म्हणत काय करायचे ते कर असं देखील म्हणताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात राहत असलो तरी पाकिस्तानला सपोर्ट करणार असं म्हणताना हा तरुण दिसत आहे., तसेच हिंदुस्तान जिंदाबाद म्हणायला नाकार देत असताना पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT