

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी (ता.8) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला फडणवीस म्हणाले, हा पूल उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्या सोडवण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता.
पुण्यासारख्या शहरात विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पुण्यात एखादी गोष्ट उभारणीपूर्वी अनेक मत मतांतर समोर येतात. लोक विविध तथ्यांच्या आधारे आपलं मत मांडत असतात अशा परिस्थितीत सगळ्यांना एकत्र आणायचं आणि पूल पाडण्याचा निर्णय घ्यायचा हे खूप कठीण काम होतं. ते दादांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण केले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले मला एका कार्यक्रमात अजित दादा बोलले होते ते आठवतं. अजित पवारांना विचारलं होतं की, तुमच्यावर पूल पाडण्याची वेळ का येते? तेव्हा अजित पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे कुठले आडेवेढे न घेता थेट सांगितलं होतं. 'मी काय इंजिनियर नाही आम्हाला जे डिझाईन येतं ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणे हे आमचं काम आहे. मात्र, त्यामुळे पुणेकरांना काही अडचण येत असेल तर त्यात दुरुस्ती करणे हे देखील आमचं काम असतं.' असं देखील दादांनी सांगितलं होतं अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली .
दरम्यान दादांच्या व्हिजन मधून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल तयार झाला असून या पुलाला अजित पवारांचं नाव घ्यावं ही जी सगळ्यांची भावना आहे. तीच माझी सुद्धा भावना आहे त्यामुळे या पुलाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं यासाठी माझी सुद्धा सहमती असून त्याबाबतची पुढील कारवाई करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.