Nilesh Lanke Pune Ph.D Sarkarnama
पुणे

Pune PhD students protest : 'आम्ही भीक मागत नाही, संशोधनासाठीचा हक्क मागतो'; 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांच्या आक्रोशावर खासदार लंकेंचा सरकारला इशारा

Pune PhD Students Protest Nilesh Lanke Warning to BJP Mahayuti Government : पुण्यातील गुडलक चौक, कलाकार कट्टा इथं 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठीचे आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke warning BJP : पुणे इथं 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठी आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके यांनी भेट दिली.

संशोधक विद्यार्थ्यांशी शनिवारी रात्री भेट घेतल्यानंतर खासदार लंकेंनी सरकारला इशारा दिला. 'या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रखर आक्रोश सरकारला परवडणार नाही, यासाठी वेळीच निर्णय घ्यावा,' असे खासदार लंके यांनी म्हटले आहे.

पुण्यातील (Pune) गुडलक चौक, कलाकार कट्टा इथं 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठीचे आंदोलन सुरू आहे. गेली सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. पावसात भिजत, रात्रंदिवस रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विद्यार्थी सरकारच्या उदासीनतेविरोधात आवाज बुलंद करत आहेत. आंदोलनात मुलींचा देखील उत्स्फूर्त सहभाग असून त्या रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच ठामपणे बसून आहेत. खासदार नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री उशिरा आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

आंदोलन करत असलेल्या 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांनी या वेळी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याशी संवाद साधताना संतप्त भावना व्यक्त केल्या. “आम्ही भीक मागत नाही, आम्ही संशोधनासाठीचा हक्क मागतो आहोत.” 2023–24 व 224–25चे 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिपसाठी पात्र ठरावेत, नोंदणीपासूनचा कालावधी मोजून फेलोशिप लागू व्हावी, थकीत व प्रलंबित फेलोशिप तातडीने मिळावी, अधिछात्रवृत्तीच्या जाहिराती प्रसिद्ध करून सर्वांना लाभ मिळावा, संशोधन दाबले तर, शेतकऱ्यांचे, कृषी विज्ञानाचे अस्तित्व आणि समाजाचा विकास धोक्यात येईल, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला.

खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनस्थळी 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांना वेदना ऐकल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारने उदासीनता सोडून तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा या युवकांचा आक्रोश आणखी प्रखर होईल, असा सूचक इशारा खासदार लंके यांनी सरकारला दिला.

दरम्यान, 'Ph.D' संशोधक विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी देखील दखल घेतली आहे. आमदार पवार आज दुपारी साडेतीन वाजता आंदोलनस्थळी संशोधक विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.

आठवड्यापासून Ph.D संशोधक विद्यार्थी सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिपची जाहिरात काढावी तसंच वेळेवर फेलोशिप द्यावी, या मागण्यांसाठी संशोधक विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आठवडा उलटूनही सरकार दखल घेत नसेल, विद्यार्थ्यांशी साधी चर्चाही करत नसेल तर हे योग्य नाही, असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT