Vinaykumar Chaube Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad police news : गुन्हेगारांबरोबर सेलिब्रेशन करणाऱ्या 'त्या' चौघा पोलिसांना आयुक्त चौबेंचा दणका

Pune Pimpri Chinchwad police officer Sangvi Police Station suspended by Commissioner Vinaykumar Chaube celebrating birthday with criminals : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यासमोर गुन्हेगारांबरोबर बर्थ डे सेलिब्रेशन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला आयुक्त विनयकुमार चौबे यांनी निलंबित केले.

Pradeep Pendhare

Maharashtra police news : पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्याला गुन्हेगारांबरोबर भर रस्त्यावर मध्यरात्री बर्थ-डे सेलिब्रेशन करणे चांगलेच भोवले आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत चौघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त चौबेंच्या या दणक्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर राज्यभरात टीका होत आहे. यातच सुसंस्कृत पुण्यातील (PUNE) पिंपरी चिंचवड इथल्या सांगवी पोलिस दलातील प्रवीण पाटील या कर्मचाऱ्याने आपल्या बर्थ-डेचे सेलिब्रेशन गुन्हेगारांबरोबर केले. भर रस्त्यावर मध्यरात्री फटक्यांच्या अतिषबाजीत हे सेलिब्रेशन केल्याने ते चर्चेत आले. तसेच या सेलिब्रेशनचे व्हिडिओ ड्रोन कॅमेने टिपण्यात आल होते. तसे ते व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ते अधिकच चर्चा झाली.

पिंपरी चिंचवडचे आयुक्त विनकुमार चौबे यांनी या सेलिब्रेशनची चांगलीच दखल घेतली. मध्यरात्री भर रस्त्यावर बर्थ-डे सेलिब्रेशन करणाऱ्या चार पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त चौबे यांनी केलं निलंबित केले. प्रवीण पाटील, विजय गायकवाड, विजय मोरे आणि खंदाग्रे, अशी निलंबित केलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त चौबे यांनी चौघांवर पोलिस दलात बेशिस्तपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. पोलिस दलात बेशिस्तपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. असे प्रकार यापुढे केल्यास अन् निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असेही चौबे यांनी म्हटले आहे.

सेलिब्रेशनमधील ते गुन्हेगार कोण?

दरम्यान, या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये पोलिसांबरोबर कोणते गुन्हेगार सहभागी झाले होते, याची चर्चा सुरू आहे. त्यांची लपवाछपवी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र व्हिडिओवरून त्यांची माहिती पोलिस अधिकारी काढत आहे. पोलिसांबरोबर गुन्हेगारांचे एवढे घरगुती संबंध कसे काय? असा प्रश्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT