
Maharashtra assembly Chaos : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न दिल्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला.
ही माहिती सभागृहाला अगोदर न दिल्याने हक्कभंग झाल्याचा आरोप करत, सत्ताधारी बहुमताच्या जोरावर सभागृहात ऐच्छिकपद्धतीने नियम बनवून वागत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळपर्यंत मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यावर निवेदन केले जाईल, असे आश्वासन दिले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरतेने हत्या झाली. याची माहिती गृह मंत्रालयाला नव्हती का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली. तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न कळवता थेट माध्यमांना दिली. हा सभागृहाचा अपमान असून, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणणार, असा इशारा विरोधकांनी दिला होता. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह विरोधक चांगलेच आक्रमक होते.
सभागृहाचे आजचे कामकाज सुरू होता, शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी काल केलेल्या विधानावरून विधान परिषदेच्या सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर विधानसभेच्या सभागृहात विरोधकांनी एकी दाखवत सत्ताधाऱ्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या माहितीवरून घेरलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभागाच्या खात्याचा कारभार आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची संपूर्ण माहिती गृहखात्याला माहिती नसणार असे होणार नाही, असे म्हणून ही माहिती लपवली गेली. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला देण्याऐवजी ती माध्यमांना अगोदर दिली. ही माहिती सर्वात प्रथम सभागृहाला द्यायला हवी होती. पण तसे न केल्याने सभागृहाचा अपमान झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी केला.
यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी कोणताही अपमान झाला नाही, असा दावा करत, विरोधकांच्या हक्कभंगाला विरोध केला. यावरून विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आज निवेदन केले जाईल, अशी माहिती सभागृहात दिली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी पाशवी बहुमतावर सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवत नाही. ऐच्छिकपद्धतीने सभागृह चालवत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सर्वात अगोदर सभागृहाला द्यायला हवी होती. सभागृह सर्वोच्च आहे. पण तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सर्वात अगोदर माध्यमांना दिली. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा खरच झाल आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सत्ताधाऱ्यांच्या या कृतीविरोधात आम्ही विरोधकांनी सभात्याग केल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.