Police investigate the Pune toxic liquor case after methanol-mixed alcohol claimed 13 lives in Pune and Pimpri-Chinchwad. Authorities have intensified raids and arrests. Sarkarnama
पुणे

Pune Toxic Liquor Case : विषारी दारूमुळे पुण्यात हाहाकार; 13 कुटुंब उध्वस्त, आरोपीने दारुत नेमकं काय मिसळलं? तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

Pune, Pimpri Chinchwad toxic liquor case : पुण्यातील या विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 8 लोकांना अटक केली आहे.

Jagdish Patil

Pune News, 29 May : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारु दारु पिल्यामुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

या विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागातील आठ, तर पुण्यातील काळे पडळ भागातील 3 आणि हडपसर भागातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मद्य प्राशन करणार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अशातच आता पोलिसांनी विषारी स्पिरिटयुक्त दारु बनवणाऱ्या आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. आरोपीने बनवलेली दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकण्यात आली आहे. तर वानखेडे हा सराईत दारु विक्रेता असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

ज्या लोकांनी वानखडेने बनवलेली दारु प्यायली त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. तर आरोपीने दारूमध्ये मिथेनॉल रसायन मिसळल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, एक आरोपी कर्नलसिंह विरखा हा दारू गुत्त्याचा मालक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे. मात्र, आता ही दारू नेमकी किती ठिकाणी विकण्यात आली आणि ती कोणीकोणी प्यायली आहे हे शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. तसंच दारू पिणाऱ्यांमध्येही ही बातमी समोर आल्यापासून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

पुण्यातील या विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसंच संबंधित ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 8 लोकांना अटक केली आहे. तसंच आरोपींवर कठोर कलमे दाखल करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT