Santosh Bangar controversy : शिवसेना मंत्र्यांच्या शेळ्या झाल्यात, वाघ...; संतोष बांगरांचा श्रीकांत शिंदेंसमोरच हल्लाबोल, पक्षात खळबळ

Santosh Bangar sparks fresh controversy Eknath shinde Shiv Sena after openly targeting party ministers front MP Shrikant Shinde during Hingoli Shivsamvad tour : एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील हिंगोली आमदार संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच, पक्षाच्या मंत्र्यांवर निशाणा साधल्याने पक्षातंर्गत खळबळ उडाली आहे.
Santosh Bangar controversy
Santosh Bangar controversySarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Shiv Sena internal conflict : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंगोलीतील विश्वासू शिलेदार आणि आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांवरच जोरदार निशाणा साधत शिवसेनेत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच बांगर यांनी मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष्य करत, मंत्री शेळ्या झाले आहेत, त्यांच्या मागे वाघ लपले आहेत, नव्या लोकांना संधी द्या, अशी थेट मागणी केली.

हिंगोली (Hingoli) इथं आयोजित शिवसंवाद दौऱ्यात बोलताना संतोष बांगर यांनी पक्षातील काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत. काही मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. त्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही. ते फोन घेत नाहीत आणि फोनही करत नाहीत. त्यामुळे अशा मंत्र्यांना बाजूला करा, असा टोला त्यांनी लगावला.

या वेळी बांगर यांनी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री शेळ्या झाले आहेत, पण त्यांच्या मागे वाघ लपले आहेत. त्या वाघांना संधी द्यायला हवी, असे म्हणत पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत अस्वस्थता असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Santosh Bangar controversy
Ramdas Athawale Upset : महायुतीत रिपाईची घुसमट? आम्हाला भाजपच्या कोट्यात ढकललं; रामदास आठवलेंची उघड नाराजी

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे मराठवाड्यातील शिवसंवाद दौऱ्यावर असून हिंगोलीतील बैठकीत त्यांनी स्थानिक संघटनांचा आढावा घेतला. याच बैठकीत संतोष बांगर यांनी आपली खदखद उघडपणे मांडली. एवढेच नाही, तर 2029 मध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असा दावाही त्यांनी केला.

Santosh Bangar controversy
Vivek Kolhe Vs Radhakrishna Vikhe Patil: ‘घायल होता हूं, तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखेंना थेट इशारा? अमित शाह-फडणवीस ‘हॉटलाइन’चाही दावा

बांगर यांच्या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील मंत्र्यांवर थेट हल्लाबोल केल्याने आता वरिष्ठ नेते याची कितपत दखल घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी संतोष बांगर यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात बांगर यांना पक्षात मोठी जबाबदारी किंवा महत्त्वाची संधी मिळण्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com