Pune Municipal Corporation headquarters amid controversy over ₹2 crore unused material purchase in the Bhandar Department. Sarkarnama
पुणे

Pune PMC: पुणे पालिकेच्या 2 कोटींच्या भांडार खरेदी प्रकरणी मोठी अपडेट; 20 अधिकाऱ्यांना नोटीस, 8 अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेच्या दोन कोटी रुपयांच्या भांडार खरेदी प्रकरणात 20 अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली. त्यातील आठ जणांनी खुलासा दिलेला नाही. जबाबदारांकडून नुकसान वसुलीची मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे भांडार विभागाने दोन कोटी रुपयांचे साहित्य घेऊन ते अनेक वर्ष धूळ खात पडून होते. यात महापालिकेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्या प्रकरणी 20 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, मुदत उलटून गेली तरी 8 जणांनी खुलासा देण्यास टाळाटाळ केली आहे.

महापालिकेने चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी साडी, ड्रेस, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मागणीनुसार कचऱ्याची दुर्गंधी टाळण्यासाठी पावडर खरेदी केली होती. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले. ठेकेदारांना बिल देण्यात आले. पण या वस्तूंचा वापर न झाल्याने साहित्य आणि पैसे दोन्ही वाया गेले.

हा प्रकार मनसेचे सरचिणीस हेमंत संभूस यांनी उघडकीस आणून आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यामध्ये भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या विभागातील उपायुक्त, अभियंता, मुख्य अभियंता या दर्जाचे अधिकारी आहेत.

यासंदर्भात चौकशी समितीने 20 जणांना प्राथमिकदृष्ट्या जबाबदार धरून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यातील 12 जणांनी उत्तर दिले आहे. तर नोटीस मिळूनही आठ जणांनी उत्तर न दिलेले नाही.

यासंदर्भात संभूस म्हणाले, अधिकाऱ्यांनी केलेले खुलासे त्रोटक व असमाधानकारक आहेत. महापालिकेचे झालेले नुकसान या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT