

Pune Metro Line 3 opening date: पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या विविध विभागाची नुकतीच बैठक झाली. यावेळी पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या १६ विकासप्रकल्प आणि कामाबाबत संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी पुण्यातील महापौर उपमहापौर यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे तसेच मीटर बसवण्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली असून याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात तसेच शहरातील फूटपाथ अतिक्रमण मुक्त केले जावेत याबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या.
चांदणी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची विकासकामे, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद स्मारक आदी कामांना वेग देण्यात यावा याबद्दलही प्रशासनाला सूचना दिल्या.
वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होत असून विमानतळाची मेट्रो कनेक्टिविटी सुरु करण्यासंदर्भात ६ विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे.
तसेच खडकवासला ते हिंजवडी मेट्रो मार्गाचा डीपीआर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. पीएमआरडीएच्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून एप्रिलअखेर २३ पैकी १३ स्टेशन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होत असून आवश्यकतेनुसार भूसंपादनही सुरु करण्यात येणार आहे. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी विमानतळाच्या भोवती पर्यायी रस्ता तयार करावा लागणार असून याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.