Shiv Sena leader Uday Samant inaugurating the party’s campaign for Pune Municipal Corporation elections while addressing party workers and candidates. sarkarnama
पुणे

PMC Election : पुण्यात शिवसेना 'किंगमेकर' ठरणार! गणित सांगून उदय सामंतांनी निवडणुकीपूर्वीच वाढवली बार्गेनिंग पॉवर

Pune Municipal Corporation Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा प्रचार सुरू करताना उदय सामंत यांनी शिवसेनेच्या मदतीशिवाय पुण्याचा महापौर होणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

सरकारनामा ब्युरो

- ज्ञानेश्वर भोंडे

PMC Election : शिवसेना पुण्‍यात 120 जागा लढवत आहे. त्‍यापैकी दखल घेतली जाईल इतके नगरसेवक निवडून येतील. शिवसेनेला विश्‍वासात घेतल्‍याशिवाय पुण्‍याचा महापौर होणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी व्‍यक्‍त केला. शिवसेनेचा प्रचाराचा नारळ सामंत यांनी पुण्‍यात शनिवारी फोडला त्‍यावेळी ते बोलत होते. भाजपसोबतची युती तुटली नसल्‍याचाही पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

युती तुटलेली नाही असे तुम्‍ही म्‍हणता, तर शिवसेनेला 120 पेक्षा जास्‍त जागांवर कसे उभे राहावे लागले, भाजपने सन्मानपूर्वक जागा का दिल्‍या नाही या प्रश्‍नावर सामंत म्‍हणाले, ‘‘भाजपसोबतची युती तुटली असे मी आजही समजत नाही. आम्‍ही 120 ठिकाणी भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. काही ठिकाणी 1 ते 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते. पुण्‍याच्‍या इतिहासात असे पहिल्‍यांदा असे असेल की 165 पैकी 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

भाजपने इतक्‍या जागा देता येणार नाही असे नम्रतापूर्वक सांगितले ते आम्‍ही स्‍वीकारले. आम्‍ही सेफ गेम खेळत नसून आम्‍ही संयमी आहोत.’’ संजय राऊत यांनी बिनविरोध जागांसाठी 5 कोटी रुपये वाटल्‍याच्‍या आरोपावर ते म्‍हणाले की, हा चुकीचा नॅरेटिव्‍ह सेट केला जात आहे. अजित पवारांनी गुंड प्रवृत्‍तीच्‍या व्‍यक्‍तीला का तिकीट दिले त्‍याबाबत ते सांगू शकतात परंतु, शिवसेनेने असे केलेले नाही.

आचारसंहितेनंतर ‘एमपीएससी’ च्‍या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सोडवू

पुण्‍यातील ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्‌यांनी मोर्चा काढला. त्‍याबाबत मनोज जरांगे यांचा फोन आला होत. विद्यार्थ्‌यांशी, मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री यांच्‍याशी मी संवाद साधला. त्‍यांच्‍यामध्‍ये एकमत झाले आहे की ही परीक्षा आचारसंहितेमध्‍ये पुढे ढकलून चालणार नाही. कारण हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्‍न आहे. परंतु, या विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत आचारसंहितेनंतर बैठक घेऊन तो सोडवू.

जोमाने प्रचार करा

शिवसैनिक संघर्षातून निर्माण झालेला आहे. वाहतुकीचा प्रश्‍न, नवले पुलाची समस्‍या, कात्रजचा विकास आराखडा, नवीन गावांचा विकास फक्त एकनाथ शिंदे करू शकतात, हे पुणेकरांना सांगा. आजपासून घराघरांत प्रचाराला सुरवात करा, असे आवाहन उदय सामंत यांनी उमेदवारांचा प्रचाराची सुरवात करताना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT