

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील तिन्ही मित्रपक्ष एकामेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. आता प्रचाराचा नारळ फुटला असून भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून खासदार, मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. हाच मुद्दा पकडत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मित्र पक्षांना खोचक टोला मारला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, शिवसेनेला आशीर्वाद द्यावं असं वातावरणात पुण्यात तयार झाला आहे. त्यामुळे मित्र पक्षांवर आणि इतरांवर टीका करण्यापेक्षा आम्ही फक्त विकासावर बोलणार आहोत. टीका करण्याचं आपलं काम हे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. आपण कोणत्याही प्रकारची टीका करायची नाही असा खोचक सल्ला उदय सामंत यांनी लगावला.
सामंत पुढे म्हणाले, निवडणुकीदरम्यान टीका करायची नाही अशा सूचना रवींद्र धंगेकर यांना दिल्या आहेत. धंगेकर यांना त्याच्याकडे असलेल्या सर्व स्टॉक राखून ठेवा असं सांगितलं आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संयमाची भूमिका घेत आहेत. त्याच पद्धतीने संयमाची भूमिका घेऊन उमेदवारांनी फक्त विकास कामावर बोलायचं आहे. असं केल्यास आपण निवडणुकीमध्ये विजय मिळवू शकतो आणि पुण्यामध्ये सगळ्यांना दखल घ्यावी लागेल असे उमेदवार आपण निवडून आणू शकतो, असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने मीडिया सेंटर सुरू केले आहे. आणि रोज विविध नेते त्याठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. त्यावर टिप्पणी करताना उदय सामंत म्हणाले, आम्ही दगडूशेठ गणपती आणि कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र काही लोकांना तिकडे जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. कारण ते प्रेस कॉन्फरन्स घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे विघ्नहर्ता आमच्या पाठीशी उभा राहील अस उदय सामंत म्हणाले.
सामंत म्हणाले, आम्ही युतीसाठी आग्रही होती. मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करूनही युती झाली नाही. त्यामुळे आम्ही 40 उमेदवार देखील उभे करू शकणार नाही असं काही जणांना वाटत होतं. मात्र आम्ही शंभर हुन अधिक उमेदवार उभे करून दाखवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.