Pune Municipal Commissioner Naval Kishore Ram responding to corporators during the General Body meeting over promotion and pension concerns. Sarkarnama
पुणे

Pune PMC : पुणे महापालिकेत पदोन्नतीवरून प्रशासनावर दुजाभावाचा आरोप; आयुक्त नवल किशोर राम यांचा खुलासा, म्हणाले...

PMC General Body Meeting : पुणे महापालिकेत पदोन्नतीमध्ये दुजाभावाचा आरोप सभागृहात झाला. आयुक्त नवल किशोर राम यांनी आरोप फेटाळत नियमावली बदल आणि पेंशन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. काही पेंशन हयात प्रमाणपत्राअभावी बंद झाल्याचे स्पष्ट केले

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेत अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना ठरावीक विभागातील अधिकाऱ्यांबाबत योग्य निर्णय घेतला जातो. काहींवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आज सर्वसाधारण सभेत प्रशासनावर करण्यात आला. त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी खुलासा करत प्रशासन कोणताही दुजाभाव करत नाही असा खुलासा सभागृहात केला.

नगरसेवक अरविंद शिंदे यांनी पदोन्नतीमध्ये होत असलेल्या दुजाभावाचा मुद्दा उपस्थित केला. ठरावीक अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली गेली आहे हे योग्य नाही. सरसकट सर्व विभागांचा निर्णय घ्या अशी मागणी सभागृहात केली. तर नगरसेविका अर्चना पाटील यांनी शिक्षण विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरु केले जात नाही, अनेक महिने वाट पाहावी लागत असून, कर्मचाऱ्यांची अडवणूक सुरु लडकत शाळेतील शिक्षणाच्या नावासह सभागृहात माहिती दिली.

आयुक्त नवल किशोर राम यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले,‘‘प्रेस विभागात आत्तापर्यंत कधीच पदोन्नती झालेली नव्हती ती आम्ही केली. लेखा अधिकारी पदासाठी बी.कॉम., अर्थशास्त्र पदवी असली पाहिजे. पण समाजशास्त्र विषयातील पदवीधर अर्ज करत आहेत. त्यामुळे सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये सीपीएसची पदवी रद्द केली आहे. पण त्यामुळे पदोन्नतीसाठी शासनाकडे विचारणा केली आहे. त्यामुळे पदोन्नती झालेली नाही. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत दुजाभाव करत नाही.

हयात प्रमाणपत्र न दिल्याने पेंशन बंद

महापालिकेकडून 14 हजार 121 जणांना निवृत्ती वेतन दिली जाते. त्यातील 12 हजार 187 जणांनी हयात प्रमाणपत्र बँकेत जमा केलेले. 1 हजार 932 जणांनी हयात प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे पेंशन बंद झाले आहे. तर अन्य काही जणांची पेंशन बंद असून, ती लवकरच सुरु करून दिली जाईल, अशी माहिती आयुक्त राम यांनी आयुक्तांना दिली.

संकेत पाळताना आयुक्तांचीही झाली गडबड

सभागृहात अनेक नगरसेवक नवीन आहेत. त्यांना सभागृहात कसे वागावे, महापौर आसनावर बसलेल्या असताना उठताना किंवा बसताना त्यांचा मान राखला पाहिजे. पण सभागृहात हे घडत नाही, त्यामुळे नगरसेवकांना प्रशिक्षण दिले पाहिजे असा मुद्दा प्रशांत जगताप यांनी मांडला. त्यानंतर काही वेळातच नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्तांनकडून संकेतांचे पालन झाले नाही. ते खुर्चीत बसून उत्तर देत होते. नगरसेवकांनी ही चूक निदर्शनास आणून देताच आयुक्तांनी ‘‘माझे चुकले, मी पहिलेंदाच सर्वसाधारण सभेला सामोरे जात आहे. त्यामुळे मला नियमांची माहिती नव्हती असे सांगितले.’’ आणि त्यांनी त्यानंतर उभे राहून प्रश्नांची उत्तरे दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT