Pune Mayor Election 2026 Sarkarnama
पुणे

Pune PMC : 'महापौरांना मिळते, मग मला का नाही?' ‘त्या’ एका सवलतीवरून उपाध्यक्ष उमेदवार अन् अधिकाऱ्यांत जुंपली; पाहा काय घडलं!

PMC internal dispute news : पुणे महानगरपालिकेत महापौरांना मिळणाऱ्या सवलतीवरून उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराने प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत वाद कसा रंगला, जाणून घ्या सविस्तर.

Sudesh Mitkar

Pune News : सेवा महत्त्वाची की सुविधा? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुवारी पालिकेच्या नगरसचिव विभागात घडलेल्या एका प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. विषय समित्यांच्या निवडणुका होण्यापूर्वीच निवड निश्चित झालेल्या एका समितीच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराने थेट गाडीची मागणी करत नगरसचिवांशी वाद घातला.

तुम्ही पहिल्याच दिवशी महापौरांना गाडी देऊ शकता, मग मला का नाही? मी उपाध्यक्ष आहे, मला महापालिकेची गाडी हवी, असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. गाडी देऊ शकत नसाल, तर मी पदभार स्वीकारायला कसा येऊ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महापौर, गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सहा विषय समित्यांचे अध्यक्ष तसेच १५ प्रभाग समिती अध्यक्षांना गाडीची सुविधा दिली जाते. मोटार वाहन विभागाचे यासाठी स्वतंत्र धोरण असून, त्यात विषय समितीच्या उपाध्यक्षांनाही वाहन देण्याची तरतूद असल्याची माहिती आहे. गुरुवारी निवडणुका पार पडण्यापूर्वीच संबंधित नगरसेवक, नगरसचिव कार्यालयात आले. पत्रकार उपस्थित असतानाच त्यांना गाडीची मागणी केली.

नगरसचिव विभागाने हा विषय मोटार वाहन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट करत, प्रस्ताव सादर करून आयुक्तांची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर पाच मिनिटांत प्रस्ताव सादर करा आणि मंजुरी मिळवा, अशी मागणी केल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी शांत भूमिका घेतल्याने अखेर माननीय संतापाने कार्यालयातून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शुक्रवारी अधिकृत निवड झाल्यानंतर संबंधित उपाध्यक्षांना गाडी देण्यात आली. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच गाडी दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, पद आधी की गाडी आधी, या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT