Sangamner Railway Political Dispute: संगमनेर रेल्वेचा पेचात विखे विरुद्ध थोरात जुंपली! रेल्वेसाठी चेंडू आता विखेंच्या कोर्टात!

Sangamner railway project controversy : संगमनेर रेल्वे प्रकल्पावरून विखे आणि थोरात यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. रेल्वेचा निर्णय आता विखेंच्या भूमिकेवर अवलंबून असल्याची चर्चा रंगली आहे.
Radhakrisha Vikhe Patil - Balasaheb Thorat
Radhakrisha Vikhe Patil - Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune Railway News: नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे असावा यावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. विधिमंडळातही यावर चर्चा झाली. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी आता नवा डाव टाकला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर ऐवजी शिर्डी मार्गे वळविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद रोज नवे स्वरूप धारण करताना दिसतो.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. आमच्या काळात मंजूर झालेला संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे मार्ग आहे तसा रहावा. तो मंजूर करून आणण्याची जबाबदारी आता विखे यांनी घ्यावी, असे थोरात म्हणाले. नाशिक पुणे रेल्वे मार्गावरून जोरदार राजकीय वाद सुरू आहे. संदर्भात नाशिक आणि पुण्याच्या नेत्यांनी संगमनेरच्या प्रस्तावाला समर्थन केले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न विधिमंडळातही उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फेर आढाव्याचे आश्वासन दिले.

Radhakrisha Vikhe Patil - Balasaheb Thorat
Ashok Chavan on NCP : नांदेड महापालिकेत कसेबसे खाते उघडलेल्या राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचा खोचक टोला,'घड्याळ आता हळूहळू..!'

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी विखे पाटील या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. रेल्वे मार्ग कसा असावा किंवा कोणत्या शहरातून जावा हे त्यांनी जाहीरपणे सांगितले नाही. आज खरा वादाचा विषय आहे. मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काहीही केले नाही. या विषयावर ते जाहीरपणे स्पष्ट भूमिका ही घेत नाहीत. फक्त अकोला आणि संगमनेर या दोन तालुक्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसा वाद त्यांनी निर्माण केला, असे माजी मंत्री थोरात म्हणाले.

विखे पाटील हे सध्या केंद्रातन राज्यात सत्ता असलेल्या सरकारचे नेते आहेत. त्यांच्याकडे केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री नियमितपणे येत असतात. त्यामुळे त्यांनी या प्रश्नात भूमिका घेऊन आम्ही मंजूर केलेल्या संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वेला मंजुरी आणावी, अशी फिरकी थोरात यांनी घेतली आहे.

Radhakrisha Vikhe Patil - Balasaheb Thorat
Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!

नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा वाद सातत्याने नवे रूप धारण करीत असतो. संगमनेर मार्गे पुणे हा रेल्वे मार्ग सोयीचा आणि कमी अंतराचा आहे. त्यासाठी नाशिक आणि पुण्याच्या खासदारांनीही थोरात यांच्या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी मंत्री विखे यांच्याबाबत केलेले विधान नव्या राजकीय वादाला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com