Pune Police News Sarkarnama
पुणे

Pune Police News : चोरांची भलतीच डेअरिंग; पोलिसांनाच दणका; सीपी ऑफिसही नाही सुरक्षित

Sunil Balasaheb Dhumal

Pune Crime News : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election धामधुमीत पोलिस प्रशासनावर मोठा ताण आहे. राज्यातील निवडणुकीते पाचपैकी चार टप्पे पार पडल्याने पोलिसांवरील काही प्रमाणात ताण कमी झाला आहे. पुणे लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान पार पडल्याने शहरातील पोलिसांचे रुटीन सुरू झाले आहे. अशातच चोरांनी थेट पोलिसांच्याच गाड्या चोरल्याचे समोर आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या पार्किंगमधून पोलिसांच्या या गाड्या चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात दुचाकी चोरीच्या घटना दररोज घडतात. त्यातील अनेक चोर हे मौज करण्यासाठी, मैत्रीणीसाठी अशा चोऱ्या करतात. तर दुचाकी चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळ्याही शहरात सक्रिय आहेत. चोरीला गेलेली वाहने पुन्हा मालकांना मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मात्र चोरांनी थेट आयुक्तलयाच्या Pune Police Commissioner पोर्किंगमधून पोलिसांच्याच दुचाकी चोरल्या आहेत. त्यामुळे शहरातील सामान्य लोकांच्या वाहनांच्या सुरक्षेचे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील पोलिस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये तीन पोलिसांनी आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्या तिनही दुचाकींवर चोरांनी डल्ला मारला आहे. पोलिस आयुक्तालयासमोरुन पोलिसांच्याच दुचाकी चोरील्या गेल्याने आता पुन्हा शहरातील वाहनांच्या सुरक्षिततेवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचेही पुढे येत आहे. दरम्यान, या तीनपैकी एक दुचाकी सापडलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अडीच महिन्यांत शहरातील एक कोटी 51 लाख 84 हजारांची तब्बल 400 वाहने चोरीला गेली आहेत. शहरात होणारी वाहनचोरी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून Pune Police मोठी खबरदारी घेतली जात आहे. असे असले तरी वाहन चोरीच्या घटना काही थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. दररोज सात ते आठ वाहने चोरी होत असल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. त्यातच चोरांनी चक्क पोलिसांच्या वाहनांवरच हात साफ केल्याने पुण्यातील वाहनांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT