Pune Crime News  Sarkarnama
पुणे

Pune Crime : काय चाललंय काय? पुण्यात पुन्हा एकदा 'खाकी'वर हात, वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

Pune Police Assault Case : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने सामान्य नागरिकांसह प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. कारण गुन्हेगार आता सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका पोलिसाला मारहाण झाली होती. त्यानंतर आता मार्केट यार्ड परिसरात पुन्हा अशीच घटना घडली.

Sudesh Mitkar

Pune News, 20 Oct : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने सामान्य नागरिकांसह प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. कारण गुन्हेगार आता सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका पोलिसाला मारहाण झाली होती.

त्यानंतर आता मार्केट यार्ड परिसरात पुन्हा अशीच घटना घडली. वाहतूक नियंत्रण करत असताना हवालदारावर ट्रक चालक व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये सुमीत सुभाष सरकटे (34 , रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे (30, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मनजीत सुभाष कांबळे (28, रा. घोरपडी गाव) अशी आहेत. या प्रकरणात हवालदार महेश सुभाष साळुंखे (39, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली असून ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास हवालदार साळुंखे हे ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकाजवळून एक ट्रक प्रचंड वेगाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघात होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तत्परतेने ट्रकला प्रवेशद्वार क्रमांक 9 जवळ अडवले.

त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी चालकाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र साळुंखे यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. यानंतर ट्रकचालकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींनी साळुंखे यांच्यावर हल्ला चढवला. हातातील धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर मारहण केली. जखमी अवस्थेतही साळुंखे यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर मार्केट यार्ड पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तत्काळ एक पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी एक मोहीम राबवली त्यानंतर काही तासांतच तिन्ही आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून सुरू आहे. अलीकडच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांचा देखील धाक गुंडांना उरलेला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT