पुणे : महापालिका निवडणूक समोर राष्ट्रवादी कॉंग्रेस काम करीत आहे. भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून दबाव आणण्यात येत आहे. पुण्याची अनेक पोलीस ठाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भूमिकेतून काम करीत आहेत, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुण्यात केली.
पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.पाटील म्हणाले, ‘‘ भाजपाच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम राष्ट्रवादीकडून पद्धतशीरपणे सुरू आहे.पिंपरीतील एका नगसेवकाविरूद्ध १९७१ चा दिवाणी दावा आता फौजदारी खटल्यात बदलण्यात आला आहे. राज्य सरकार सत्तेचा गैरवापर करीत आहे.या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. गेल्या २७ महिन्यात या सरकारने एकही न्यायालयीन खटला जिंकलेला नाही.प्रत्येक ठिकाणी सरकारला पराभूत व्हावे लागले आहे. ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या विषयातदेखील राज्य सरकारला यश आले नाही. सामान्य मराठा तसेच ओबीसी तरूणांना यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.’’
पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने विकासाची मोठी कामे उभी केली आहेत.भाजपाचे पाच वर्षातील काम व आधीच्या पन्नास वर्षातील कामाची तुलना पुणेकर निश्तचतपणे असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पाच वर्षातील कामे आणि गेल्या पन्नास वर्षातील कामे हाच या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक यांच्यावर कारावाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ईडीची कारवाई सुरू असताना त्यावर बोलणे योग्य नसल्याचे सांगत यावर अधिक बोलण्याचे पाटील यांनी टाळले.नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ जातीवरून, धर्मावरून भांडण लावण्याचे काम शरद पवार करीत असतात. गेल्या पान्नास वर्षातील त्यांच्या राजकारणाकडे पाहिले तर हे स्पष्ट होईल.’’
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.