Pune Police Parade Sarkarnama
पुणे

Pune Police News : पोलिस आयुक्तांच्या 'परेड'नंतर काही तासांतच नीलेश घायवळने दाखवला ‘दम’!

Chaitanya Machale

Pune News : पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सलग दोन दिवस शहरातील कुख्यात गुंडांची 'परेड' घेतली. यामध्ये आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी या गुन्हेगारांना केल्या होत्या. मात्र परेड झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच यातील काही गुन्हेगारांनी सोशल मीडियावर रिल्स टाकण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत गुंडगिरी सुरूच ठेवण्याचे संकेत यानिमित्त गुन्हेगारांनी दिले आहेत. (Pune Police News) Nilesh Ghaiwal Reels

शहरातील गुन्हेगारांना समजावून सांगण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात सराईत गुन्हेगारांना बोलावले होते. तेथे त्यांची हजेरी घेण्यात आली. यापुढील काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल असे कोणतेही वर्तन करणार नाही. तसेच त्यामध्ये आपला सहभाग राहणार नाही, अशी हमी या गुन्हेगारांकडून घेऊन त्यांना समज देण्यात आली. यापुढील काळात तुमची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही. असा दमच पोलिसांनी भरला होता. (Pune Latest News)

मंगळवारी शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी अवैध धंदे आणि अमली पदार्थ तस्कारांची पोलिसांनी परेड काढली. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकांकडून ही परेड काढण्यात आली. मात्र हे सर्व झाल्यानंतर देखील पोलिसांच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करत कुख्यात गुंडांचे काही रिल्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारमधील नेत्यांबरोबर गुंडांचे फोटो व्हायरल झाले होते. गेल्या आठवड्यापासून राजकीय पुढाऱ्यांबरोबर हे फोटो येत असल्याने विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासह स्वतः अजित पवार यांचा एका गुंडाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे या नेत्यांना विरोधकांच्या टीकेला ही सामोरे जावे लागले होते.

यापार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी शहरातील सर्व कुख्यात गुंड आणि टोळी प्रमुखांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलाविण्यात आले होते. यामध्ये गुंड निलेश घायवळ याला त्याच्या गॅंगमधील गुन्हेगारांचा समावेश होता. पुन्हा असे फोटो व्हायरल करायचे नाही, रेकॉर्ड करायचे नाही असा दम पोलिसांनी दिला होता. सोशल मीडिया अकाउंटची माहिती पोलिसांना कळवायची फेक अकाउंट कोणी तयार केले असतील तर त्याचीही माहिती पोलिसांना कळवायची, असे सांगितले होते. मात्र पोलिसांनी सज्जड दम दिल्याच्या काही तासांतच पुन्हा गुंड घायवळचे रिल्स व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT