Pune Criminals : 'रिल्स'ने गेलेली 'परेड'ने येणार का?; घायवळ, मारणे, बोडकेंसह गुंडांना पुणे पोलिसांनी भरला दम!

Gaja Marane, Baba Bodke, Nilesh Ghaywal : पुण्यातील 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या 50 टोळ्यांतील सुमारे अडीचशेहून अधिक सराईत गुन्हेगारांची हजेरी
Pune Criminals
Pune CriminalsSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कुख्यात गुंड निलेश घायवळचा फोटो, त्यानंतर त्याची थेट मंत्रालयातील व्हायरल झालेली रिल्स, यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य बनवण्यात आलं. त्या अगोदर भाजप आमदारानं शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर केलेला गोळीबार धुरळा उडवून गेला. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्याचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळ, बाबा बोडके, गजानन मारणे यांच्यासह शहरातल्या तब्बल 267 गुंडांना एकत्र करुन त्यांची झाडाझडती घेतली. मात्र, सरकारवर होत असलेल्या टीकेवरचा हा 'व्हाईटवाॅश' आहे का? 'रिल्स'ने गेलेली गुन्हेगारांच्या 'परेड'नं परत येणार का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये पोलिस ठाण्यात भाजप आमदाराने गोळीबार केला. नंतर या आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले. यानंतर गुंडांचा थेट मंत्रालयातील वावर पाहून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठू लागली. त्यानंतर जागे झालेल्या पुणे पोलिसांनी शहरातील कुख्यात तब्बल 267 गुंडाची हजेरी घेत त्यांना तंबी दिली.

Pune Criminals
Nilesh Rane News : राणेसाहेबांवर एक शब्द जरी काढला तर..; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा...

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शासकीय निवासस्थान वर्षा इथला फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मंत्रालयातील घायवळची रिल्स पोस्ट करून सरकारवर सडकून टीका केली.

दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंडांच्या उदात्तीकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे नवे आयुक्त अमितेश कुमारांनी त्यांना जोरदार दणका दिला. कुमारांनी दिलल्या आदेशानुसार पुण्यातील सर्व गँगच्या कुख्यात गुंडांसह त्यांच्या 267 सहकाऱ्यांची हजेरीच घेतली.

Pune Criminals
Abdul Sattar : कृषीमंत्री पद गेल्यानंतरही अब्दुल सत्तार पुन्हा जर्मनी दौऱ्यावर; आताचं कारण काय ?

पुण्यात गुन्हेगारी वाढते आहे. जमिनीच्या वादातून शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. पाच जानेवारी रोजी कोथरूड परिसरात गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.‌ अशा परिस्थितीत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.

कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50 टोळ्यांतील सुमारे अडीचशेहून अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलिस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलिस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Criminals
Maratha Reservation : आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेबाबत राहुल गांधींची मोठी घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com