Pune Porsche Car Accident Sarkarnama
पुणे

Pune Porsche Car Accident: पोलिसांनी लढवली शक्कल अन् ससूनच्या डॉक्टरांचे बिंग फुटलं! पोलिसांची चतुराई...

Sudesh Mitkar

Pune News: कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आज अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात ससूनमधील दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पोलिसांच्या एका चतुराईमुळे या डॉक्टरांचे बिंग कुठल्याचं समोर आले आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणाती(Pune Porsche Car Accident) बिल्डर वडीलाच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा बळी घेतल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात आणलं होते. त्यावेळी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख असलेल्या श्रीहरी हलणोर (Srihari Halanore) यांनी अल्पवयीन आरोपीचे सॅम्पल घेतले मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी ते बदलले असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.

रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे (Dr. Ajay Taware)यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याचं देखील उघड झाले आहे. तावरे यांनी ब्लड सॅम्पल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅम्पल टेस्टिंग साठी देण्यात आले.

आरोपीच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या पैशाच्या अमिषानंतर हा सगळा प्रताप डॉक्टरांनी केला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणामध्ये चतुराई दाखवत खबरदारीचा उपाय म्हणून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवले होते. त्या ठिकाणी नमुनांची डीएनए टेस्ट पोलिसांनी केली. यामधून ससून मध्ये टेस्ट करण्यात आलेले सॅम्पल हे त्या अल्पवयीन आरोपीचे नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हे सॅम्पल बदलल्याचं पोलिसांना समजले आणि डॉक्टरांचे बिंग फुटले.

दरम्यान काल रात्री पुणे पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आज दुपारी त्यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणारा असून पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येईल.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT