Pune Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ससूनमधील डॉक्टरला अटक; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार?

Sassoon Hospital Dr. Ajay Taware Arrested : या प्रकरणांमध्ये सर्वात कळीचा मुद्दा राहिला तो अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट. या ब्लर्ड रिपोर्टमध्ये अल्पवयीन आरोपीने अल्कोहोल घेतले होते का नाही याबाबत खुलासा होणार आहे. या रिपोर्टवरच या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे.
Pune Car Accident
Pune Car AccidentSarkarnama

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये (Pune Porsche Car Accident) रोज नवनवीन खुलासे बाहेर येत असून आज पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक केली. ससून येथील एका डॉक्टरला (Sassoon Hospital) पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी एका बड्या बापाच्या बिघडलेल्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेमध्ये दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला काही किरकोळ अटींसह जामीन मिळाल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

नंतर या प्रकरणांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल होत गुन्हेगारांवर वर कड़क कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत या प्रकरणांमध्ये अटक सत्र सुरू केले आहे. आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीचा जामीन देखील रद्द करण्यात आला असून त्याला देखील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणामध्ये सर्वात कळीचा मुद्दा राहिला तो अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट. या ब्लड रिपोर्टमध्ये अल्पवयीन आरोपीने अल्कोहोल घेतले होते का नाही याबाबत खुलासा होणार आहे. या रिपोर्टवरच या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

आता याच ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाली असल्याचं समोर आलं आहे. या आरोपाखाली आता पुणे पोलिसांनी ससून येथील डॉक्टर अजय तावरे (Dr. Ajay Taware) याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये पैसे घेऊन कशाप्रकारेची फेरफार करण्यात आली का ? याबाबत आता पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Pune Car Accident
Porsche Car Accident Update : पुणे अपघातप्रकरणी सोमवारी सुनावणी; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल...

ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून हे गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ब्लड रिपोर्टच्या माध्यमातून अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र या रिपोर्टमध्ये देखील आरोपींनी त्यादिवशी मद्य प्राशन केलं होतं हे समोर येऊ नये म्हणून ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्तालयात त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी कशाप्रकारे यंत्रणा कामाला लागते, याचे आणखी एक उदाहरण समोर आल्याचे बोलले जात आहे.

कल्याणीनगर भागात रविवारी (१९ मे) मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com