Pune Police and Pooja Khedkar Sarkarnama
पुणे

Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी पाठवले समजपत्र!

Pune Police and Pooja Khedkar News : जाणून घ्या, या समजपत्रातून पुणे पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे? ; पूजा खेडेकर यांची आयएएस म्हणून झालेली नियुक्तीही वादात सापडली आहे.

Chaitanya Machale

Trainee IAS Officer Pooja Khedkar of Pune Collectorate पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. पूजा खेडेकर यांना पुणे पोलिसांनी समजपत्र बजाविले आहे. आपल्या खासगी ऑडी कारवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावत या कारच्या पुढील आणि मागच्या बाजूला महाराष्ट्र शासन लिहिल्याने, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावित ही कार आणि त्याची कागदपत्रे पोलिस स्टेशन येथे आणावी, असे सांगितले आहे.

गेल्या वर्षी 2023 मध्ये डॉ. पूजा खेडेकर(Pooja Khedkar) या आयएएस झाल्या आहेत. त्यांना राज्य सरकारने प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती दिली होती. ही नियुक्ती मिळाल्यानंतर खेडकर यांनी स्वतंत्र दालनाची मागणी केली. त्यामध्ये सोयीसुविधा असाव्यात अशी त्यांची भूमिका होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर त्यांनी बळकावले. तसेच अनेक अधिकाऱ्यांना त्या दमबाजी करत असल्याचे प्रकार समोर आले.

त्यांच्याकडून कर्मचारी, अधिकारी यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्या कामाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात सेवा देण्यासाठी पाठवावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार राज्य सरकारने वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून काम करणाऱ्या डॉ पूजा खेडेकर यांची आयएएस म्हणून झालेली नियुक्ती वादात सापडली असून पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबतची कागदपत्रे राज्य सरकारकडून मागून घेतली आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना पूजा खेडेकर यांनी आपल्या खाजगी गाडीवर सरकारी लाल निळा अंबर दिवा लावला होता. तसेच या गाडीवर महाराष्ट्र शासन असे देखील लिहिले होते. याच गाडीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दंड देखील लावण्यात आलेला आहे. मात्र हा दंड अद्यापही भरण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे. खासगी वाहनावर सरकारी अंबर दिवा लावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 177 नुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही खासगी आपण वापरत असल्याचे लक्षात आल्याने पुणे पोलिसांनी त्यांना समजपत्र बजावित ही गाडी आणि गाडी संबंधीची आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रे तपासासाठी चतु:शृंगी वाहतूक पोलिसांच्या विभागाकडे द्यावी, असे या समजपत्रात म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शफिल पठाण यांनी हे समजपत्र दिले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पूजा खेडेकरांच्या आईने केला कांगावा -

डॉ. पूजा खेडेकर वापरत असलेल्या ऑडी कारची माहिती घेण्यासाठी पुणे पोलिस गुरुवारी दुपारी खेडेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांच्या आईने ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. त्यांना बंगल्यात येऊ दिले नाही. 'तुम्हाला बघून घेईल', असे म्हणत त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील अपशब्द वापरले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT