Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदली करण्यात आलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर गुरूवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. खेडकर यांची संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, त्यांच्या विविध अवाजवी मागण्यांमुळे त्या वादात अडकल्या आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉ. पूजा खेडकर यांची मागीलवर्षी प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. कामादरम्यान त्यांनी सुसज्ज स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला होता.
खेडकर यांनी आलिशान गाडीवर लाल आणि निळा दिवा लावून मिरवत होत्या. कार्यालयातील त्रास वाढल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे याबाबतचा अहवाल पाठवला होता. त्यानंतर खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली.
वाशिम कार्यालयात खेडकर गुरूवारी रुजू झाल्या. वादानंतर खेडकर एकदाही माध्यमांसमोर आल्या नव्हत्या. वाशिममध्ये रुजू झाल्यानंतरही त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. सॉरी म्हणत त्यांनी आपण यावर बोलण्यास अधिकृत व्यक्ती नसल्याचे सांगितले.
तुम्हाला काहीही सांगण्यासाठी मी अधिकृत व्यक्ती नाही. कारण सरकारी नियमांनुसार, या प्रकरणावर मी काहीही बोलण्यास परवानगी नाही. त्यामुळे सॉरी, मी काही बोलणार नाही. मी आज वाशिममध्ये रुजू झाले आहे. इथे काम करण्यासाठी मी अभिलाषी आहे, असे खेडकर यांनी मीडियाला सांगितले.
डॉ. पूजा या नक्की आयएएस कशा झाल्या? त्यांनी अपंगत्वाची सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत का? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यूपीएससीची परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर केले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. सरकारने याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.