Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

रजा वाढविल्याबद्दल पोलिसांनी मानले गृहमंत्री वळसे पाटलांचे आभार!

गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलिस दलात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत.

सुदाम बिडकर

पारगाव (जि. पुणे) : राज्यातील पोलिसांना पूर्वी किरकोळ रजा वर्षभरात फक्त १२ दिवस मिळायच्या. त्या आता २० दिवस करण्यात आल्या आहेत. तसेच, राज्यातील पोलिस कॉन्स्टेबलचे पोलिस अधिकारी (कॉन्स्टेबल आता फौजदार म्हणून निवृत्त होणार) होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा पुणे ग्रामीण पोलिस आणि मंचर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती. (Pune Police thanks Home Minister for extending casual leave)

गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलिस दलात अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना यापूर्वी वर्षभरात फक्त १२ किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्यात वाढ करत एकूण २० दिवस करण्यात आल्या आहेत. विधानसभेत बोलताना त्यांनी विधीमंडळातून मी एकाही पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा करणार नाही, असे सांगितले होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे रविवारी (ता. २० मार्च) आंबेगाव तालुक्यातील पारगावमधील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना स्थळी आले होते. त्यावेळी मंचर पोलिस ठाण्यातील कर्मचारी तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने वळसे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, मंचर पोलिस ठाण्याचे गणेश साळुंके, प्रशांत भोईर, राजेश नलावडे, संतोष जाधव, श्रीकृष्ण पोरे, वैभव सावंत व पुणे ग्रामीणचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT