पवार-ठाकरेंचे आभार मानत सतेज पाटलांनी व्यक्त केला हा विश्वास!

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता जयश्रीताईंच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
Uddhav Thackeray-Sharad Pawar-Satej Patil
Uddhav Thackeray-Sharad Pawar-Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडला. काँग्रेसकडून (स्व.) आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना शनिवारी (ता. १९) रात्री उशिरा उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार मानत कोल्हापूरची स्वाभिमानी जनता जयश्रीताईंच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. (Satej Patil thanked Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar)

सोशल मीडियावर पोस्ट करत गृहमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मनःपूर्वक आभार! (स्व.) चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता श्रीमती जयश्रीताई जाधव यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, हा विश्वास आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Satej Patil
राजेश क्षीरसागरांनी वाढवले सतेज पाटलांचे टेन्शन : फोनही घेतला नाही

दरम्यान, कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघात युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्याकडून शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीमुळे ही जागा शिवसेनेला काँग्रेस पक्षाला सोडावी लागली. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक आणि क्षीरसागर कमालीचे नाराज झाले आहेत. मतदारसंघ सोडण्याचा निर्णय झाल्यापासून क्षीरसागर हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. ते आज कोल्हापुरात येणार आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे कोल्हापूरबरोबरच राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Satej Patil
शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’ : सतेज पाटील म्हणतात ‘आमचं ठरलंय...’

दुसरीकडे, पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम, काँग्रेसकडून जयश्री जाधव, करुणा मुंडे, अभिजित बिचुकले हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. यात कदम आणि जाधव हे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. हे दोघे पक्षीय उमेदवार असले तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटामध्येच खरी लढत असणार आहे. हे दोन्ही नेते ताकदीने निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com