Pune NCP vs Shivsena  Sarkarnama
पुणे

NCP vs Shivsena : निवडणुकीनंतर पुण्यात राष्ट्रवादी अन् शिवसेनेतील हिंसाचार उफाळला, शिंदेंच्या नेत्याच्या अंगावर गाडी घातली, डोक्यात दगड अन्...

Pune Political Attack : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारे दगडफेक करत भ्याड हल्ला करण्यात आला होता. अशातच आता आणखी एका हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Jagdish Patil

Pune News, 22 Jan : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एका शिवसैनिकांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. राष्ट्रवादीचे नेते उल्हास तुपे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यासह आणखी दोन जणांवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. हल्लेखोरांनी सुरूवातीला शिवसैनिकांना कारने धडक दिली.

त्यानंतर ४०-५० जणांच्या टोळीने या शिवसैनिकांच्या डोक्यात दगड घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उल्हास तुपे यांनी केल्याचा आरोप कुलाळ यांनी केला आहे. तर या हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारे दगडफेक करत भ्याड हल्ला करण्यात आला होता. अशातच आता आणखी एका हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या हल्ल्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली आणि मुलानी शस्त्राने हल्ला केल्याचा आरोपही दीपक कुलाळ यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT