Girish Mahajan : शिंदेंच्या शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेत सहभागी न करण्याचे महाजनांनी दिले संकेत; म्हणाले, युतीत 70 जागाही आल्या नसत्या...

Nashik Municipal Election 2026 : भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बुधवारी (ता.२१) झाली. यावेळी गिरीश महाजन यांनी महापालिकेत आगामी राजकारणाचे पत्ते उघडले. नाशिकमध्ये कमतरता राहिल्याचे मान्य केले. या निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती केली नाही.
Girish Mahajan,Nashik NMC Election
Girish Mahajan,Nashik NMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 22 Jan : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी राजकीय धोरण स्पष्ट केले. भाजप नगरसेवकांचे कानही टोचले.

भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बुधवारी (ता.२१) झाली. यावेळी गिरीश महाजन यांनी महापालिकेत आगामी राजकारणाचे पत्ते उघडले. नाशिकमध्ये कमतरता राहिल्याचे मान्य केले. या निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती केली नाही.

शेवटपर्यंत चर्चेत गुंतवून शेवटच्या क्षणी महायुती फिसकटली. त्या मागचा हेतू महाजनांनी उघड केला. भाजपला महापालिका निवडणुकीत ७२ जागा मिळाल्या. युती केली असती तर ७० जागाही निवडून आल्या नसत्या. त्यामुळे नाशिकमध्ये महाजन यांनी अतिशय सावध केळी खेळली.

Girish Mahajan,Nashik NMC Election
PMC Mayor Election: महापौरपदाची सोडत उद्या अन् निवडणूक 2 फेब्रुवारीला? कोणाच्या गळ्यात पडणार माळ याची उत्सुकता

आगामी काळात नाशिक महापालिकेत महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती भाजपचच असेल. त्यासाठी पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. महापौर कोण? याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Girish Mahajan,Nashik NMC Election
Murlidhar Mohol : पुण्यातील 'ते' भाजप नेते नगरसेवक पदापासून दूर राहणार ; मंत्री मुरलीधर मोहोळांचा इशारा

नवनिर्वाचित नगरसेवकांनी आता कामाला लागावे. पक्षाच्या विरोधात कोणतेही वर्तन करू नये. पक्षाची शिस्त सगळ्यांनी पाळली पाहिजे. पक्षविरोधी वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, या शब्दात त्यांनी नगरसेवकांचे कान टोचले.

या निमित्ताने नाशिक महापालिकेत भाजप स्वबळावर आगामी धोरण ठरवणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला विरोधात बसावे लागणार हे यातून स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय डावपेच रंगण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com