Devendra Fadnavis 1 Sarkarnama
पुणे

Pune Politics : पुण्यातून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? CM फडणवीस पुण्यात येताच सस्पेन्स संपणार

Mahayuti Government Expansion : भाजपकडून शपथ घेणाऱ्या भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट फोन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी फडणवीस यांच्याकडून भावी 22 मंत्र्यांना संपर्क करून उद्याच्या शपथविधीसाठी नागपुरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News,14 Dec : विधानसभा निवडणुकीनंतर रविवारी (ता.15) नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. भाजपला 22 शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचंही बोललं जात आहे.

त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून फडणवीस सरकारमध्ये नेमकी कोणत्या नेत्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उद्या नागपूरमध्ये (Nagpur) मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने आज संभाव्य मंत्र्यांना आपापल्या पक्षांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचा निरोप दिला जाणार आहे.

फोन आला की तुमचं मंत्रीपद फिक्स झालं अशा पद्धतीचा निरोप या भावी मंत्र्यांना मिळणार आहे. भाजपकडून शपथ घेणाऱ्या भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे थेट फोन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी फडणवीस यांच्याकडून भावी 22 मंत्र्यांना संपर्क करून उद्याच्या शपथविधीसाठी नागपुरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

तर मुख्यमंत्री फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सायंकाळी पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी फडणवीसांसोबत भाजपचे पुणे (Pune) जिल्ह्यातील बहुतांश आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यानच पुणे जिल्ह्यातून भावी मंत्री होणाऱ्या नेत्यांना फडणवीसांकडून मंत्रिपदाबाबतचा निरोप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष असलेले 21 पैकी 19 आमदार आहेत. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेंची शिवसेना या तीनही पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून शहरात मंत्री आणि जिल्ह्यामध्ये एखादे राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्याखेरीज इतर भाजपच्या कोणत्या आमदाराच्या राज्य राज्यमंत्रीपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे चौथ्यांदा निवडणूक जिंकले आहेत.

दोन्ही सीनियर नेते असले तरी अद्याप त्यांच्या गळ्यात अद्याप मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. तर सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सोबतच जिल्ह्यातून राहुल कुल आणि पिंपरी चिंचवडमधून महेश लांडगे हे देखील राज्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत.

त्या सोबतच विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झालेले योगेश टिळेकर यांची देखील ओबीसी चेहरा म्हणून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. त्यामुळे उद्या पुणे जिल्ह्यातील एक कॅबिनेट मंत्री भाजपकडून शपथ घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी त्यासोबतच दुसरा नवखा कोण असणार याबाबतचा सस्पेन्स आज संपणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT