Pune News : पुण्यातील कल्याणीनगर येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाने काही अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने IT क्षेत्रात काम करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांना जोरदार तडक दिली होती. त्यामध्ये त्या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले होते.
कार चालक अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. मात्र, मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्याचे कारस्थान त्याच्या कुटुंबीयांनी गेले होते, ज्यात विशाल अग्रवाल यांच्यासह त्यांची पत्नी शिवानी अग्रवाल, डॉक्टर्स आणि हॉस्पिटल स्टाफचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात विशाल अग्रवाल यांना २१ मे २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तब्बल २२ महिन्यांहून अधिक काळ ते न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने डिसेंबर मध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले होते.
सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकरणातील इतर काही आरोपींना यामध्ये डॉ. अजय तावरे यांचा समावेश आहे त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर विशाल अग्रवाल यांच्या याचिकेवर नोटीस जारी करून सुनावणी घेतल्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने दीर्घकाळ कोठडी, आणि इतर आरोपींना जामीन मिळाल्याने आणि इतर मुद्द्यांचा विचार मंजूर केलास त्याचं सांगितलं जात आहे.
अग्रवाल यांना खटल्यात पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये तसेच जामिनाच्या अटींचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होईल, असेही निर्देशात नमूद केले आहे.
जामीन मिळालेले आरोपी:
डॉ. अजय तावरे
अमर गायकवाड (मध्यस्थ)
आशपाक मकानदार (मध्यस्थ)
मागील सीटवर बसलेला अल्पवयीन
आशिष मित्तल
शिवानी अग्रवाल
विशाल अग्रवाल
अल्पवयीन चालक
अद्याप कारागृहात असलेले आरोपी:
ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर
ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.