Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident News: कल्याणीनगर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावलं? पोलिस आयुक्तांनी दिलं उत्तर

Sudesh Mitkar

Pune Hit And Run Case: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेमध्ये गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर मृतांचे आई-वडील नातेवाईक आणि काही मित्र येरवडा पोलिस चौकी येथे गेले असता, 'तुम्ही इथे जास्त काळ थांबलात तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू' अशा प्रकारे धमकावत मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वाईट वागणूक दिली असल्याचं बोललं जात आहे. यावर आता पुणे पोलिस आयुक्तांनीच खुलासा केला आहे. (Pune Kalyaninagar Hit And Run Case Update)

पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyaninagar) परिसरात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं, या घटनेत दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. तर या प्रकरणात पोलिसांनी (Pune Police) मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. तर आरोपीच्या वडिलांना आज छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना अटक केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मँनेजर्सना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपींविरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "अपघातामधील अल्पवयीन आरोपीचा अल्कोहोल घेतल्याचा रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही. मात्र सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे त्याने अल्कोहोल घेतलं असल्याचे स्पष्ट झालं आहे. पोलिस अत्यंत गांभीर्याने या प्रकरणांमध्ये तपास करत असून कोणताही कसूर ठेवला जाणार नाही याची काळजी घेत आहेत. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी संपर्क साधला असून याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."

मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून धमकावण्यात येत असल्याबाबत प्रश्न विचारला असता अमितेश कुमार म्हणाले, नातेवाईकांना वाईट ट्रीटमेंट दिल्याबाबत आमच्या कानावरती या गोष्टी आल्या असून याबाबत तपास अधिकारी नेमण्यात आले आहेत. नातेवाईकांशी प्राथमिक चर्चा झाली असून अशा प्रकारची कुठलीही घटना झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र या प्रकरणांमध्ये कोणताही पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आरोपीला मदत करण्याच्या उद्देशाने काही केलं असेल अथवा नातेवाईकांसोबत काही दुर्व्यवहार केला असेल आणि ते समोर आले तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असंही पोलिस आयुक्तांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT