Pune Porsche Accident News : पुणेकरांचा आवाज चढला, राज्यकर्त्यांना कानठळ्या बसताच CM शिंदेंनी 'सीपीं'ना कडक सूचना केल्या

Pune Porsche Car Accident News : पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीनं युवकानं पोर्श गाडीनं दोघांना उडवलं होतं. यात दोघांचा मृत्यू झाल्यावर युवकाला दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
eknath shinde amitesh kumar Porsche car accident
eknath shinde amitesh kumar Porsche car accidentsarkarnama
Published on
Updated on

Pune Accident News, 21 May : पुण्यात दारूच्या नशेत 'धूम' स्टाइल गाडी चालवून दोघांचा जीव घेतलेल्या आणि या अपघाताला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाईची मागणी करीत पुणेकरांचा आवाज चढताच कानठाळ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना बसल्या आहेत. याप्रकरणी कोणालाही पाठीशी न घालता आरोपी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनीही 'हिट अँड रन' प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घातल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ( Amitesh Kumar ) यांना फोन करत कुणालाही पाठीशी न घालता आणि राजकीय दबावाला बळी न पडता कायद्यानं कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

परिणामी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मंत्र्यांमुळे पुण्यातील पोलिस यंत्रणा हालली असून तपासात वेग येण्याची आशा आहे. दुसरीकडे राजकीय दबावामुळे तपासात कसर ठेवलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनाही धडा मिळू शकतो. पण, मुख्यमंत्री ( Eknath Shinde ) आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांची यंत्रणा किती वेगानं फिरणार आणि आरोपीच्या पिंजऱ्यात कोण-कोण अडकणार याकडे लक्ष लागलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी फोनवरून संवाद साधला आहे. पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागणार, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रशासन योग्य कारवाई करत नाही, हा जनतेता भ्रम आहे. तो संभ्रम दूर व्हायला पाहिजे. आरोपी आणि याप्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे. त्याच अनुषंगाने पोलिस पहिल्या दिवसापासून काम करत आहेत."

eknath shinde amitesh kumar Porsche car accident
Pune Porsche Accident : पोलिस आयुक्त म्हणजे पुण्याला लागलेले 'कलंक', त्यांना बडतर्फ करा, राऊत कडाडले !

कल्याणीनगर परिसरात भरघाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्याशिवाय मुलगा अल्पवयीन असूनही बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल गाडी बेजबाबदारपणे त्याला गाडी चालविण्यास दिली. त्यामुळे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. पण, पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना मंगळवारी ( ता. 21 ) छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.

eknath shinde amitesh kumar Porsche car accident
Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणी टीकेच्या भडीमारानंतर अखेर आमदार टिंगरे आले समोर; म्हणाले... !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com