Ajay Bhosle Pune Accident Agarwal Sarkarnama
पुणे

Ajay Bhosle ON Surendra Agarwal: अजय भोसले वाचले, पण मित्राच्या छातीत गोळी शिरली! तेव्हा नेमकं काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

Pune News:कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघातात (Pune Porsche Accident) दोन जणांना जीव गेला. दारुच्या नशेत पोर्शे गाडी चालवत दोघांना चिरडणारा अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

अगरवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर आले आहे. अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्यानंतर वेदांतचे आजोबा सुरेंद्र अगरवाल त्यांचे भाऊ राजकुमार अगरवाल यांच्यासोबतच्या जमिनीच्या व्यवहारातून पुण्यातील शिंदे गटातील नेते अजय भोसलेंवर हल्ला करण्यात आला होता. याबाबत अजय भोसलेंनी या हल्ल्यामागे सुरेंद्र अगरवाल यांचाच हात असल्याचे सांगितले. अजय भोसले एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मी 2009 मध्ये वडगावशेरी विधानसभेची निवडणूक लढवत होतो. सुरेंद्र अगरवाल यांचे बंधू रामकुमार अगरवाल यांच्यासोबत मी काम करीत होतो. दोन्ही भावाची आर्थिक व्यवहारावरून भांडण सुरु होते. मी रामकुमार यांना मदत करतो, यांचा राग मनात धरुन सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनला मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. छोटा राजनच्या साक्षीदारांनी माझ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मी वाचलो, पण माझ्या मित्रांच्या छातीत गोळी शिरली होती. हा हल्ला छोटा राजन यांच्या सांगण्यावरून केला असल्याचे एक वर्षांनंतर आरोपींनी कबुल केले होते. त्यासाठी सुरेंद्रकुमार यांनी सुपारी दिल्याचा जबाब आरोपींनी दिला आहे," असे भोसले यांनी सांगितले.

सध्या हा खटला सीबीआयकडे सुरु आहे. यात छोटा राजनसह आठ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात माझी व सुरेंद्रकुमार यांची साक्ष झाली आहे. सुरेंद्रकुमार जेव्हा साक्ष देण्यासाठी कोर्टात येतात, तेव्हा त्यांना व्हीआयपी वागणूक मिळते. अगरवाल कुटुंब हे पैशाच्या जोरावर काहीही करु शकते. सुरेंद्रकुमार याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांचा अद्याप अटक झालेली नाही, असे भोसले यांनी सांगितले. कल्याणीनगर अपघातातही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही, असे भोसले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT